Stock Market : शेअर बाजाराची किरकोळ वाढीसह सुरूवात; बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा कल

आयसीआयसीआय बँक आणि ग्रासिम इंडस्ट्रीज च्या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमधून सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. तर दुसरीकडे

Stock Market : शेअर बाजाराची किरकोळ वाढीसह सुरूवात; बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा कल

Stock Market : शेअर बाजाराची किरकोळ वाढीसह सुरूवात; बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा कल

Share Market Today : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मंगळवारी किरकोळ वाढीसह झाली. (Share Market) मंगळवारी निफ्टीमध्ये १७ अंकांच्या वाढीनंतर २४७९९ च्या पातळीवर व्यवहार सुरू झाला. तर, सेन्सेक्स ४ अंकांच्या वाढीसह ८१,१५५ वर खुला झाला. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा कल दिसून येत आहे. आज पुन्हा या दोन्ही क्षेत्रांतील हेवीवेट शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातही खरेदी दिसून येत आहे.

दुभंगलेल्या बालेकिल्ल्यात शिवसेनेत होणार मुख्य लढत; छत्रपती संभाजीनगर शहरात कोण बाजी मारणार?

अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि ग्रासिम इंडस्ट्रीज च्या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमधून सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. तर दुसरीकडे, निफ्टी ५० निर्देशांकातील सुरुवातीला टाटा स्टील, बीईएल, बीपीसीएल आणि हीरो मोटोकॉर्प सारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

शेअर बाजाराच्या सोमवारच्या सत्रात बाजार तेजीसह उघडला, पण ती तेजी कायम राहू शकली नाही आणि बाजार दिवसभराच्या नीचांकी पातळीजवळ बंद झाला. निफ्टी ७३ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर दुसरीकडे सोमवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज आणि एस अँड पी ५०० घसरणीसह बंद झाले.

Exit mobile version