Atiq Ahmed Murder case: गॅंगस्टार आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या दोघांना पोलिस रुग्णालयात तपासणीसाठी नेत होते. त्याचवेळी दोघांची हत्या झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्य सरकारवर आरोप होऊ लागले आहेत. आता या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) प्रवेश केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे.
Atiq Ahmed : अतिक अहमदच्या संपत्तीचा आकडा वाचाल तर डोळे पांढरे होतील
पोलीस महासंचालक, प्रयागराजचे पोलीस आयुक्त यांना ही नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसाला या अधिकाऱ्यांनी चार आठवड्यात उत्तर द्यायचे आहे. अतिक आणि अशरफ यांची पोलिसांची ताब्यात असताना हत्या झाली आहे. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार झालेली आहे. त्याची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. हत्या झालेल्यांना का अटक केली होती. त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती, त्यांच्या अटकेची माहिती, आयोगाला द्यावीत, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल… विधानभवनातून अजित पवारांचा राऊतांवर रोख…
शनिवारी रात्री अतिक अहमद आणि अशरफ यांची अरुण मौर्या, सनी सिंग, लवलेश तिवारी यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अतिकवर तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अतिकच्या डोक्यात, मानेत आणि छातीत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या तिघांना घटनास्थळावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेली आहे.
अतिकने 2005 मध्ये बसपाचे आमदार राजू पाल यांची हत्या केली होती. या हत्येतील गुन्ह्यातील महत्त्वाचा साक्षीदार उमेश पाल होता. त्याची या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. त्यानंतर प्रयागराज येथे दोघांना आरोग्य तपासणीसाठी नेत असताना दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.