Atiq Ahmed : अतिक अहमदच्या संपत्तीचा आकडा वाचाल तर डोळे पांढरे होतील

Atiq Ahmed : अतिक अहमदच्या संपत्तीचा आकडा वाचाल तर डोळे पांढरे होतील

Gangster Atiq Ahmed had a wealth of 11 thousand crores : कुख्यात गॅंगस्टर आणि समाजवादी पार्टीचा नेता अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची शनिवारी खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, आता अतिकच्या मालमत्तेचा (Atiq’s property) आकडा समोर आला. अतिकने 2019 च्या लोकसभा निवडणूक (2019 Lok Sabha Elections) लढवतांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 25 कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं होतं. मात्र, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अतिककडे तब्बल अकरा हजार कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं.

अतिक हा राजकारणात येण्यापूर्वी एक माफिया होता. त्याने काळ्या मार्गाने भरपूर संपत्ती जमवली होती. तसंच राजकारणात आल्यानंतर त्यांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. अतिकने आतापर्यंत पाच वेळा आमदारची निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2004 मध्ये अतिक हा खासदार म्हणून निवडणूक आला होता. आठवी पास असलेला अतिक हा 5 वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेला आहे. अतिकने 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली होती. प्रतिज्ञापत्रानुसार, अतिककडे 25 कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. मात्र, तेव्हा अतिकची एकूण संपत्ती उघड झाली नव्हती. त्याने तेव्हा दिलेली माहिती खोटी असल्याचं आता समोर आलं. कारण, एका माहितीनुसार अतिक हा 11000 कोटी रुपयांचा मालक होता.

Hemangi Kavi : आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली…, हेमांगी कवीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली “ते केल्याने…”

अतिकची मालमत्ता प्रयागराज ते दिल्ली आणि मुंबईपर्यंत पसरलेली आहे. 44 वर्ष प्रयागराजमध्ये गुंडाराज चालवणाऱ्या अतिकने प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आणि बेनामी मालमत्ता जमवली. आयकर विभागाची कागदपत्रे आणि निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये काही कोटींची मालमत्ता तसेच रोख दाखवणाऱ्या अतिकच्या संपत्तीचे आणि काळ्या पैशाचे खरे स्वरूप आणि सत्य हे 2017 नंतर उघड होऊ लागलं. यूपी पोलीस आणि प्रशासनाने अतिकच्या मालमत्तेची चौकशी केली तेव्हा, त्याच्या संपत्तीचा आकडा हा 11000 कोटींच्या घरात गेला होता. अतिककडे असलेल्या संपत्तीत सोन्या, चांदीचा समावेश आहे. त्याने प्रयागराजच्या काही भागात कवडीमोल भावाने खरेदी केलेल्या मालमत्ता ह्या सरकारने राईट ऑफ केल्या आहेत. अतिक आणि त्याच्या कुटुंबियांनी अनेकांना धमकावून शिवाय, इतर गुन्हेगारी कृत्यातून ह्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube