Download App

अतिकच्या ‘त्या’ शेवटच्या पत्रात काही ‘बड्या’ नेत्यांची नावे?

Atique Ahmed’s Last Letter : कुख्यात गँगस्टर अतिक अहमद हा मृत्यूच्या भयाने पछाडलेला होता. त्यामुळे मृत्यूपूर्वी त्याने एक पत्र लिहिले असून या पत्रात त्याने मी मेलो, तर हे पत्र सर्वोच्च न्यायालयात पाठविण्यात यावे, असे म्हटले होते. त्यानुसार अतिकचे ते पत्र सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविण्यात आले आहे.

‘ज्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे, अशांची नावे अतिक अहमदने लिहिलेली असण्याची शक्यता असून काही नेते आणि अधिकाऱ्यांची नावे देखील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजितदादांना कसं ट्रॅक कराल?; सुप्रिया सुळेंनी दिली आयाडिया! – Letsupp

अतिक अहमद याने ते पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने लिहिलेले आहे. एका प्रकरणात २९ मार्च रोजी सुनावणीसाठी जात असताना त्या पत्राचा उल्लेख अश्रफ याने केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे, अशा काही नेते, अधिकाऱ्यांची नावे या पत्रात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने दोन एसआयटी स्थापन केल्या आहेत. पोलिस महासंचालक आर. के. विश्वकर्मा यांनी प्रयागराजचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रयागराज पोलिस आयुक्त आणि एफएसएल संचालक यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. दुसरीकडे, प्रयागराज पोलिसांनही शहागंज पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या हत्येप्रकरणी दुसरी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

या खून प्रकरणानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरी बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. योगींची सुरक्षाही दुपटीने वाढविण्यात आली आहे.

Tags

follow us