राजस्थानमध्ये ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या टीमवर हल्ला; आशुतोष रांकांना धक्काबुक्की अन् दगडफेक

Cockroach Janata Party : कॉक्रोज जनता पार्टीच्या टीमवर राजस्थानमध्ये हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील जयपूर

Cockroach Janata Party

Cockroach Janata Party

Cockroach Janata Party : कॉक्रोज जनता पार्टीच्या टीमवर राजस्थानमध्ये हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील जयपूर येथील रामपुरा-कंवरपुरा गावात पक्षाचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली असून त्यांच्या गाडीच्या खिडक्या फोडल्याची देखील माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजस्थान सरकारवर जोरदार टीका केली आहे. म्हशींच्या गोठ्यात चालणाऱ्या शाळेला भेट देण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली असल्याचा दावा त्यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.

आशुतोष रांका (Ashutosh Ranka) दिलेल्या माहितीनुसार, रामपुरा-कंवरपुरा गावात शुक्रवारी सकाळी कॉक्रोज जनता पार्टीची (CJP) टीम म्हशींच्या गोठ्यात चालणाऱ्या शाळेची पाहणी करण्यासाठी गावात गेले होते मात्र भाजपचे सदस्य तिथे आले आणि त्यांनी त्यांना बळजबरीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा आशुतोष रांका यांनी केला आहे. यावेळी त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत गावाबाहेर नेले याच दरम्यान काही लोकांनी दगड मारून गाड्यांच्या खिडक्या फोडल्या. हा विरोध गावकऱ्यांनी नाही, तर भाजप सदस्यांनी केला होता. यातील मुख्य सूत्रधार कमल प्रधान नावाचा व्यक्ती आहे, ज्याने शाळेच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे असं देखील आशुतोष रांका म्हणाले.

भाजपला (BJP) शाळांची स्थिती सुधारण्यात काहीही रस नाही. कॉक्रोज जनता पार्टीच्या टीमवर जेव्हा हल्ला होत होता तेव्हा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप देखील रांका यांनी केला आहे. केवळ राजस्थानमध्येच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. ‘कॉक्रोज जनता पार्टी’ यात सुधारणा करण्यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत आहे. शाळांसाठी अभिजीत दीपके मोहीम सुरू करणार आहेत असेही आशुतोष रांका म्हणाले.

माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष! ‘द रेव्होल्यूशनरीज’चे भव्य भक्तिगीत ‘जय दुर्गा’ प्रदर्शित

तर दुसरीकडे अभिजीत दीपके यांनी देशभरातील शाळांवर लक्ष केंद्रित करणारी मोहीम जाहीर केली आहे. ते आपल्या स्वतःच्या गावातून या आंदोलनाची सुरुवात करतील. त्यांची टीम देशभरातील गावागावांतील शाळांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीची नोंद घेईल. त्यानंतर, ते केंद्र सरकारसमोर सादर करण्यासाठी मागण्यांचे एक निवेदन (चार्टर) तयार करतील. जर सरकारने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला, तर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एकत्र करून देशव्यापी आंदोलन करण्याचा त्यांचा मानस आहे.

Exit mobile version