Sourav Das : अभिजीत दीपकेसह आम्हाला अटक करणार अन्…, CJP नेत्यांचा सरकारवर गंभीर आरोप

Sourav Das :  निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्या मागणीसाठी काँक्रोज जनता पार्टीने आंदोलनाची सुरुवात केली आहे. 

Sourav Das

Sourav Das :  निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्या मागणीसाठी काँक्रोज जनता पार्टीने आंदोलनाची सुरुवात केली आहे.  10 ऑक्टोबरपासून आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठा आंदोलन उभा करणार अशी घोषणा देखील पक्षाकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे  आता सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरकार अभिजीत दिपकेसह सीजेपीच्या इतर प्रमुख नेत्यांना अटक करणार असल्याचा दावा सौरव दास (Sourav Das) यांनी केला आहे. सरकार त्यांना, तसेच अभिजीत, आशुतोष आणि सीजेपीच्या इतर नेत्यांना अटक करण्याचा कट रचत आहे असा दावा त्यांनी एक्सवर केला आहे.

तसेच जर सरकारला वाटत असेल की, अशा हुकूमशाही पद्धती यशस्वी होतील, तर तो त्यांचा गैरसमज आहे. तरुण पिढी आता जागृत झाली आहे. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठीचा लढा सुरू ठेवावा असं देखील सौरव दास म्हणाले. आम्ही एकत्र असू किंवा वेगळे, तुरुंगवास किंवा त्याहूनही वाईट परिस्थितीचा सामना करण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. तरीही, ही एक मोठी चूक ठरेल. तरुण हे सहन करणार नाहीत. निदर्शने सुरूच राहिली पाहिजेत. 10 ऑक्टोबर रोजी एक प्रचंड जनआंदोलन सुरू होईल, याची खात्री भारतातील जनतेने केली पाहिजे असं देखील ते म्हणाले.

पाठिंबा द्यायला आलो माझं चुकलं का..? MPSC आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकरांना विरोध-

अभिजीत दीपके काय म्हणाले?

तर दुसरीकडे सौरव दास यांच्या या दाव्यावर बोलताना अभिजीत दिपके (Abhijit Dipke) म्हणाले की, अमित शाह, तुम्ही किती लोकांना अटक करणार? 10 ऑक्टोबरला संपूर्ण देश रस्त्यावर उतरणार आहे. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये पुण्यात एमपीएससी आयोगाविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत  सरकारने या तरुणांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत कारण तेच महाराष्ट्राचे भविष्य आहेत. न्याय आणि उत्तरदायित्वाच्या लढ्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’ सर्व एमपीएससी उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं म्हटलं आहे.

follow us