Kalindi Express : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात रविवारी रात्री एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल बॉम्ब रुळावर टाकून कालिंदी एक्स्प्रेस (Kalindi Express) रुळावरून घसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली. घटनास्थळाची परिस्थिती पाहता यामागे काही मोठे षडयंत्र रचल्याचे दिसतंय, असं रेल्वे प्रसासनाचं म्हणणं आहे. त्यामुळं सर्व तपास यंत्रणा देखील अलर्ट झाल्या आहेत.
Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना
काल (रविवारी) संध्याकाळी उशिरा कालिंदी एक्सप्रेस ट्रेन प्रयागराजहून भिवानीला जात होती. बिल्हौर रेल्वे स्थानकावर, लोको पायलटला ट्रॅकवर गॅस सिलिंडर दिसला आणि त्याने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला. त्यामुळं रेल्वे अपघात सुदैवाने टळला आहे. यानंतर घटनास्थळी तपासणी करण्यात आली. ट्रॅकजवळ पेट्रोलने भरलेली बाटली, गॅस सिलेंडर आणि माचिसची काड्या देखील आढळून आल्या. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, रेल्वेचा अपघात घडवण्याचा हेतू होता.
भारत आणि पाकिस्तानला जे जमले नाही ते श्रीलंकेने करून दाखवलं, इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजय
दरम्यान, या प्रकरणाचा उत्तर प्रदेश जीआरपी आणि एसटीएफ तपास करत आहे. मात्र हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने आरपीएफही आपल्या स्तरावर तपास करत आहे. तर दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय एएनआयला असल्याने एनआयएनेही तपास सुरू केला. एनआयएच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली.
एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण सामान्य वाटत नाही. या घटनेचे बारकाईने निरीक्षण केलं असता रुळावर ट्रेन उतरवण्याचा प्रयत्न केला. रुळावर सिलिंडर टाकून ट्रेन रुळावरून घसरायची आणि नंतर त्याचा स्फोट घडवायचा, असं कट असल्याचं दिसून येतं. तसेच घटनास्थळी पेट्रोलने भरलेली बाटली आणि माचिसच्या काड्या सापडल्याने त्यामागे काही मोठे षडयंत्र रचले गेल्याच्या संशयाला बळ मिळालं. यात एका व्यक्तीचा हात नसून दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न असू शकतो, असं एनआयएच्या सुत्रांनी सांगितलं.
एनआयएने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या तपासात एनआयएला यूपी एटीएस आणि आरपीएफला सहकार्य करत आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी दिवसभर रेल्वे मंत्रालयात बैठका सुरू होत्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नियोजनबद्ध पद्धतीने ट्रेन रुळावरून उतरवून स्फोट घडवण्याचा कट होता. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकत होती. मात्र, रेल्वे चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावल्याने जीवितहानी झाली नाही.