Download App

Atiq Ahmed : अतिक अहमदच्या वकीलाला संपवण्याचा प्रयत्न; दयाशंकर मिश्रा यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट

  • Written By: Last Updated:

Attempt to terminate Atiq Ahmed’s lawyer; Bomb blast near lawyer Dayashankar Mishra’s house : शनिवारी प्रयागराजमध्ये कुख्यात गॅंगस्टर आणि समाजवादी पार्टीचा नेता अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची शनिवारी खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर तीन हल्लेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, ही घटना ताजी असतांनाच आता अतिक अहमद याच्या वकीलाच्या (Advocate OF Atiq Ahmed) घरासमोरच बॉम्बस्पोट घटवून आणल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतांनाच आता अतिक अहमद याचा वकील असलेले दयाशंकर मिश्रा यांच्या घरासमोरच बॉम्बस्पोट घटवून आणल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एका माध्यम संस्थनेने दिलेल्या वृत्तानुसार, आतिक अहमदचे वकील मिश्रा म्हणाले की, मला वाटते की हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे मोठे षडयंत्र असू शकते. मला घाबरवण्याच्या उद्देशाने 3 बॉम्ब फेकण्यात आले. बॉम्ब फेकले त्यावेळी परिसरात धुराचे लोट पसरले होते, असं ते म्हणाले.

प्रयागराजचे सहाय्यक पोलिस आयुक्त (शिवकुटी) राजेश कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नलगंज पोलिस स्टेशन हद्दीतील कटरा येथील गोबर गली येथे काही तरुणांनी वैयक्तिक वैमनस्यातून बॉम्ब फेकले. हर्षित सोनकर नावाच्या युवकाचा रौनक, आकाश सिंग आणि छोटू यांच्यासोबत पैशांवरून वाद झाला आणि त्यामुळे सोनकरने रौनक, आकाश आणि छोटू यांचा पाठलाग करून त्यांच्यावर क्रूड बॉम्ब फेकला. योगायोगाने वकील दयाशंकर मिश्रा यांच्या घरासमोरच हा बॉम्ब पडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, बॉम्ब फेकून सोनकरने घटनास्थळावरून पळ काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पोलीस लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असं यादव यांनी सांगिलते.

शनिवारी (15 एप्रिल) रात्री कॅल्विन हॉस्पिटलमध्ये आलेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची तीन तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून संपूर्ण शहरातील परिस्थिती संवेदनशील आहे.

Tags

follow us