Download App

राम मंदिर सोहळ्याला सोनिया गांधी जाणार? काँग्रेसकडून सस्पेन्स कायम…

Sonia Gandhi News : येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठीचं निमंत्रण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह मल्लिकार्जून खर्गे, (Mallikarjun Kharge) अधीर रंजन चौधरी यांना देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह देशभरातून राजकीय क्षेत्रातील 6 हजारांपेक्षा अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशातच लोकसभा निवडणुकाही उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. निमंत्रण मिळाल्यानंतर सोनिया गांधी सोहळ्याला जाणार की नाही? याबाबत अद्याप काँग्रेसकडून सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. काँग्रेसने हा सस्पेन्स कायम का ठेवला असेल? याबाबतच्या चर्चांना ऊत आला आहे.

अरबाजच्या लग्नानंतर पहिली पत्नी मलायकाचा लग्नाबाबत मोठा खुलासा; म्हणाली, ‘कोणी विचारले तर..’

देशभरात दिवाळीसारखा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण तयार करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी विविध जिल्ह्यांतही कार्यक्रमांचं आयोजन करुन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना अधिकृतपणे निमंत्रण देण्यात आल्याची पुष्टी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.

जयराम रमेश म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. सोनिया गांधी कार्यक्रमाला जाणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून योग्यवेळी निर्णय घेऊन कळवले जाणार असल्याचं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे. जाईल. दरम्यान, अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने काँग्रेस पक्षाची कोंडी झाल्याचे स्पष्ट झाली असल्याची चर्चा रंगलीयं.

किंग खानसोबत शूटिंग करताना उपाशी राहिलेली ट्विंकल खन्ना; म्हणाली, ‘पोट सपाट दिसण्यासाठी….’

सोनिया गांधींसह काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने राम मंदिराच्या कार्यक्रमात भाग घेतल्यास देशभरात मुस्लिम मते विखुरण्याचा धोका निर्माण होईल, अशी भीती पक्षाला वाटत आहे. विधानसभा निवडणुकीत विविध राज्यांतील मुस्लिम मतदार काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांवर अधिक विश्वास व्यक्त करत आहेत. आता लोकसभा निवडणुकीत या वेळी मुस्लिम मतदार काँग्रेसकडे बघतील, अशी पक्षाला आशा असल्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

सोनिया गांधी किंवा अन्य पक्षाच्या नेत्याने राम मंदिर सोहळ्याला हजेरी लावली नाही तर भाजपला हल्लाबोल करण्याची मोठी संधी मिळणार, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. भाजपकडून काँग्रेस नेत्यांवर राम मंदिराच्या विरोधात असल्याचा आरोप करत आहे. या परिस्थितीत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित न राहिल्यास सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांना लक्ष्य करण्याची संधी मिळणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

follow us