Download App

Udayanidhi Stalin : जो कोणी उदयनिधींचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटींचे बक्षीस; परमहंस आचार्यांची घोषणा

  • Written By: Last Updated:

Udayanidhi Stalin  : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांचे सुपुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. अयोध्येतील संत परमहंस आचार्य (Saint Paramhansa Acharya) यांनी उदयनिधींच्या पुतळ्याचे दहन करताना घोषणा केली की, जो कोणी उदयनिधींचा शिरच्छेद करील त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

एक व्हिडिओ ट्विटवर शेअर करण्यात आला असून त्यात संत परमहंस आचार्य हे उदयनिधींच्या फोटोचं दहन करतांना दिसत आहे. त्यात ट्विटमध्ये लिहिलं की, जो कोणी उदयनिधींचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटींचे बक्षीस देण्यात येईल.

उदयनिधी वक्तव्यावर ठाम
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपनेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीये. तर दुसरीकडे उदनिधी अजूनही त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. ते म्हणाले, जे काही बोललो ते पुन्हा पुन्हा सांगेन. मात्र, आता त्यांनी निवेदनात एक नवीन लिंक जोडली आहे की मी फक्त हिंदूच नाही तर सर्व धर्मांचा समावेश केला आहे. मी माझ्या वक्तव्यात जातीभेदाचा निषेध केला आहे.

आमदार शिंदेंच्या मतदारंसघात खासदार चिखलीकरांचचं वर्चस्व; बाजार समिती निवडणुकीत केलं चीतपट 

सनातन धर्माबद्दल वादग्रस्त टिप्पणी
तामिळनाडू सरकारमधील युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (२ सप्टेंबर)ला चेन्नई येथील आयोजित कार्यक्रमात बोलतांना सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली. सनातन धर्माला विरोध नाही तर पूर्णपणे त्याचे निर्मुलन करायला हवं, असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्याने देशभरात वातावरणं पेटलं आहेय

हिंदुत्ववादी नेत्यांनी निदर्शने केली
तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याविरोधात हिंदूत्ववादी नेत्यांनी रिकबगंज हनुमानगढीजवळ निदर्शने केली. स्टॅलिनच्या अटकेची मागणी नेत्यांनी केली आहे.

स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देश दुखावला असल्याचे भाजप नेते दिनेश जयस्वाल यांनी म्हटले आहे. सनातन धर्म शतकानुशतके अस्तित्वात आहे आणि राहील. मुघल आक्रमकांनीही हा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. स्टॅलिनसारखे नेते केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी सनातन धर्माविरुद्ध अशी विधाने करत आहेत, जे अक्षम्य आहे.

भाजप नेते राजीव शुक्ला म्हणाले की, सनातन धर्म जगाच्या कल्याणाची कामना करतो. उदयनिधींनी सनातन धर्माला शिव्या दिल्याने त्यांची खालची मानसिकता दिसून येते आणि हे लोक व्होट बँकेसाठी काहीही करायला तयार असतात हेही दिसून येते.

 

Tags

follow us