कर्नाटक (कलबुर्गी) : भाजपचे नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा (B S Yediyurappa) हे हेलिकॉप्टर अपघातात थोडक्यात बचावले आहेत. येडीयुराप्पा यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हे उतरताना हा अपघाता झाला आहे. हेलिकॉप्टर उतरताना मैदानातील प्लास्टिक पिशव्या आणि कचरा उडू लागला. हवेत सगळीकडे कचरा उडाल्यामुळे हेलिकॉप्टर उतरताना काही काळ अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, काही वेळानंतर आखेर हेलिकॉप्टर व्यवस्थित उतरवण्यात आले. त्यामुळे येडीयुराप्पा सुखरूप उतरले.
Karnataka: Helicopter carrying Yediyurappa faces difficulty in landing at helipad filled with garbage
Read @ANI Story | https://t.co/vw1SfIvHSh#Helicopter #yediyurappa #Karnataka #Garbage pic.twitter.com/3r2BXYrsYU
— ANI Digital (@ani_digital) March 6, 2023
कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जवळच्या जेवरगी येथे बी. एस. येडीयुराप्पा हे भाजपच्या विजय संकल्प रॅलीच्या एका कार्यक्रमानिमित्त येणार होते. येत्या काही महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, स्वच्छता आणि सुरक्षेची काळजीच घेण्यात आली नसल्याने हेलिकॉप्टर उतरताना अडचणीचे ठरले. काही काळ हेलिकॉप्टर उतरताना हेलकावे बसले होते.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट; गुन्हा दाखल
आखेर संपूर्ण मैदानाची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. मात्र, या सर्व प्रकारात हेलिकॉप्टर बराच वेळ हवेमध्येच थांबवावे लागले आहे.