मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट; गुन्हा दाखल
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेले आहे. अशाच प्रकारे सोशल मीडियावर देखील कार्यकर्त्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु असते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका तरुणाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Eknath Shinde-Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट (Offensive tweets) केले होते. त्या तरुणाविरोधात नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हा दाखल झाला आहे. तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या तरुणाविरोधात नागपुरात गुन्ह्याची नोंद झालीय. सार्थक कपाडी नावाच्या तरुणाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे आक्षेपार्ह ट्वीट केलं. मुंबईत राहत असलेल्या सार्थक कपाडी या तरुणाविरोधात नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद झालीय.
मुक्ताईनगरमधील अवैध धंद्यांवरुन खडसे-महाजन आमने सामने
नागपुरच्या लकडगंज पोलीस ठाण्यात नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे तक्रार दिली होती. तक्ररीनंतर कलम 354, 500, 504 या अंतर्गत सार्थक कपाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी कपडीला अटक करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र पोलीसांना संशय आहे की त्याचे ट्विटर आकाउंट तो स्व:ता वापरतो की त्याच्या नावाने फेक बनले गेले आहे. याचा सायबर विभागाकडून तपास सुरु आहे.
त्या ट्विटमध्ये अतिशय धक्कादायक आणि अश्लील मजकूर लिहिलेला होता. भाजप नेत्यांना याची कल्पना नव्हती. सार्थक कपाडी या आकाउंटला फॉलो करणाऱ्या एका महिलेच्या हे लक्ष्यात आले. त्यानंतर त्यांनी आमदार कृष्णा खोपडे यांना माहिती दिली होती. यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. सार्थक कपाडी हा ठाकरे गटाचा जवळचा कार्यकर्ता आहे. या संपूर्ण प्रकारामागे ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. पोलीस देखील त्याच दिशेने तपास करीत आहेत.