मुक्ताईनगरमधील अवैध धंद्यांवरुन खडसे-महाजन आमने सामने

मुक्ताईनगरमधील अवैध धंद्यांवरुन खडसे-महाजन आमने सामने

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाही.मुक्ताईनगरमधील (Muktainagar) अवैध धंद्यांवरुन एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजनांना लक्ष केले आहे. मुक्ताईनगरमधील अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे आणि राजकीय संरक्षण आहे, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यामधील कुर्हा, अंतुर्ली या भागामध्ये चक्री नावाचा मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. याबाबत पोलीसांकडे तक्रार करुन देखील कारवाई केली जात नाही. या अवैध धंदेवाल्यांना राजकीय संरक्षण आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Amitabh Bachchan यांना या आधीही झाली होती दुखापत, वाचा किस्सा…

एकनाथ खडसे म्हणाले, मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रोडवरील चेक पोस्ट वरती गोसावी नावाच्या व्यक्तीचं हॉटेल आहे. या हॉटेलमधून गांजा, अफू आणि जुगार चालतो. याच हॉटेलमध्ये अवैधरित्या दारूही मोठ्या प्रमाणात विकली जाते. अवैधरित्या गांजा, अफू आणि दारू विक्रीसह जुगार याचा सर्वात मोठा मुक्ताईनगर तालुक्यातला अड्डा हा गोसावीचाच आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

मी वारंवार याची प्रशासनाला माहिती देऊनही एसपी, डीआयजी यांनी कारवाई केली नाही. याचं कारण काय तर यांच्याकडून पैसे गोळा केले जातात. या अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे संरक्षण आहे. राजकीय संरक्षण आहे, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube