India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव (India Pakistan War) वाढलेला असताना पाकिस्तानला दणका देणारी एक बातमी आली आहे. चिनाब नदीवर बनलेल्या सलाल धरणाचे फक्त एक गेट उघडे आहे. त्यामुळे पाकिस्तानात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. तर बगलिहार धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. सिंधू पाणीवाटप करार स्थगित (Indus Water Treaty) झाल्यानंतर भारत सरकारने धरणांचे दरवाजे बंद केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार चिनाब नदीवरील सलाल धरणाचे एक गेट सध्या खुले आहे. यामुळे नदीत पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. खरंतर धरणाच्या पाण्यातून वीज तयार करण्यासाठी टर्बाइन चालवण्यासाठी आवश्यक पाण्याच्या हिशोबाने पाणी सोडले जात आहे. कारण भारताने पाकिस्तानात पाण्याच्या प्रवाहावर प्रतिबंध लावला आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Two gates at the Baglihar Hydroelectric Power Project Dam built on the Chenab River in Ramban have been opened.
(Latest visuals from the spot; shot at 3 pm today) pic.twitter.com/890GN6Irn1
— ANI (@ANI) May 8, 2025
जम्मू काश्मीर भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील जलाशयांत भरपूर पाणी जमा झाले आहे. याच गोष्टीचा विचार करून रामबनमधील बगलिहार धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पाण्याचा प्रवाह थोडा वाढला आहे. रामबन जिल्ह्यात मुसळधार पावसाने काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. रामबन एसएसपी ट्रॅफिक राजा आदिल हामिद यांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे एनएच 44 बंद आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. रस्ता साफ करण्याचे कामही सुरू आहे.
Video : “पाकिस्तानच्या एअर डिफेन्सला नष्ट केलं, आता सुधरा नाहीतर..” भारताचा पाकला निर्वाणीचा इशारा
दरम्यान, याआधी केंद्र सरकारने सलाल आणि बगलिहार धरणांचे सर्व दरवाजे बंद करून पाकिस्तानला जाणारे पाणी रोखले होते. यामुळे चिनाब नदीतील पाणी कमी झाले होते. नदीचे पाणी कमी झाल्याने पाकिस्तानात कृषी आणि पर्यावरण या दोन्ही क्षेत्रांवर अत्यंत वाईट परिणाम होतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आता धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पाकिस्तान आता दहशतवादापासून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत पाकिस्तानचा सहभाग राहिला आहे. पाकिस्तानच्याच संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानचे संबंध मान्य केले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी करुन पाकिस्तानने फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पठानकोट, मुंबई हल्ल्यात भारताने पाकिस्तानला पुरावे दिले होते तरी देखील त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही असे मिस्त्री यांनी सांगितले.