Ban on production of ethanol from B. molasses, sugarcane juice and syrup lifted: देशांतर्गत बाजारात साखरेचा मुबलक साठा राहण्यासाठी केंद्र सरकारने बी मॉलिसिस ( B. molasses) आणि ऊसाचा रसापासून इथेनॉल निर्मितीला (ethanol) बंदी घातली होती. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीस अडथळे निर्माण झाले होते. आता पुन्हा साखर कारखान्यांना (Sugar Factory) पूर्वीप्रमाणेच इथेनॉल निर्मिती/strong> करता येणार आहे. कारण केंद्र सरकारने उसाचा रस आणि बी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी हटविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय येत्या गाळप हंगामापासून लागू होणार आहे. यंदाचा गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल.
शिवरायांची एकदाच काय, शंभरवेळा माफी मागेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माफीनामा!
मागील हंगामात देशात कमी साखर उत्पादन होईल, असा अंदाज होता. साखर उत्पादनाला फटका बसू नये म्हणून केंद्राने काही निर्णय घेतले होते. त्यात साखर निर्यातीला बंदी घातली होती. तसेच उसाचा रस आणि बी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा आदेश अन्न व वितरण विभागाने 7 डिसेंबर रोजी घेतला होता. परंतु या आदेश साखर कारखान्यांनी विरोध दर्शविला होता. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी या बंदीला विरोध दर्शविला होता. शेतकरी, शेतकरी संघटना आणि कारखानादारांनी विरोध करत बंदी उठविण्याची माणी केली होती. त्यानुसार साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतुसाठी त्या कोटा ठरवून दिला होता. त्याचा फायदा झाला नाही.
काश्मीर खोऱ्यात यंदाही तीन ठिकाणी साजरा होणार गणेशोत्सव; पुनीत बालन यांची माहिती
परंतु यंदा देशात साखरेचे उत्पादन मुबलक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बी मोलॉसिस आणि उसाच्या रसापासून इनेथॉल निर्मितीवर लावलेली बंदी हटविण्यात आली आहे. याचा देशातील 15 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना याचा फायदा होणार आहे. कारण कारखान्यांनी इॅथेनॉल निर्मितीसाठी मोठ-मोठ प्रकल्प उभारले होते. त्यासाठी वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेऊन या प्रकल्पांमध्ये 50 हजार कोटींची गुंतवणूक केली होती.