सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. त्या फोटोमध्ये बँक ऑफ बडोदा बँकेच्या युएईमधील (UAE एका शाखेबाहेर ग्राहकांची भली मोठी रांग दिसते आहे. ही रांग नवीन खाते उघडण्यासाठी अथवा पैसे काढण्यासाठी नसून खाते बंद करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नक्की खरे काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
युएईमध्ये बँक ऑफ बडोद्याच्या ( Bank Of Baroda ) अल ऐन शाखेबाहेर ग्राहकांची रांग असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बँक ऑफ बडोद्या बँकेच्या सीईओने आम्ही अदानींना कर्ज देणे चालू ठेवू असे भाष्य केले होते. यानंतर लोक आपले बँक ऑफ बडोदामधील खाते बंद करत आहेत व त्यामुळे बँकेच्या बाहेर लोकांची गर्दी दिसते आहे, असे सोशल मीडियावर बोलले जात आहे. यावर यूजर्सने सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. बँक ऑफ बडोदा अदानीला कर्ज देते आहे म्हणून आम्ही आमचे खाते बंद करत आहोत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.
(UPI विस्तारासाठी RBI प्रयत्नशील, मॉरिशस आणि इंडोनेशियाशी चर्चा सुरू)
यावर बँक ऑफ बडोदाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाची एल आय एन ब्रँच यावर्षी बंद होणार आहे. बँकेला दुरुस्त करण्यासाठी ही शाखा बंद करण्याचा निर्णय मागच्यावर्षी घेण्यात आला होता. त्यामुळे येथील बँकिंग सेवा सुनिश्चित राहण्यासाठी येथील बँकेचे अकाउंटस् अबू धाबी येथील शाखेमध्ये ट्रांसफर करण्यात येणार आहे. तसेच जे ग्राहक आपले खाते बंद करु इच्छितात ते 22 मार्च पर्यंत करु शकतात, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे बँकेने सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट ही खोटी असून अफवा पसरवणारी असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अदानी ग्रुपच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतच आहे. हिंडेनबर्ग संस्थेने त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. आता मात्र ते तिसाव्या क्रमांकाच्याही खाली घसरले आहेत.