Download App

Banking Crisis Explainer : ४८ तासांत सिलिकॉन व्हॅली, सिग्नेचर बँक का बुडाली ?

नवी दिल्ली : अमेरिका येथील सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley Bank) आणि सिग्नेचर बँक (Signature Bank) या दोन्ही बँका आवघ्या ४८ तासांत बुडाल्या आहेत. बँका बुडण्याचा वेग पाहिला तर अमेरिकेसह जगभरातील एकूणच बँकिंग व्यवस्थेसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. इतक्या वेगाने बँक बुडाल्याने लोकांना विचार करायला देखील वेळ मिळाला नाही. अमेरिकेच्या इतिहासात अचानक बंद होणाऱ्या तीन बँकामध्ये सिलिकॉन व्हॅली, सिग्नेचर या दोन बँका आहेत. तर यापूर्वी २००८ मध्ये वाशिंगटन म्युच्युअल बँक बुडाली आहे. त्यामुळे या बँका इतक्या वेगाने का बुडत आहे. त्यामागची कारणे जाणून घेणे हे महत्वाचे आहे.

व्यावसायिक बँकासमोर कॉमन लोन डिफॉल्ट हा खूप महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला क्रेडिट रिस्क असे देखील म्हटले जात आहे. परंतु, सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक बुडण्यामध्ये हे कारण नाही. तर बँकिंग क्षेत्रातील तज्ञांच्या मते लिक्विडीटी आणि व्याज दर ही दोन मोठी कारणे आहेत.

एका बँकेत छोट्या काळात व्याज दरात मोठी वाढ केल्यावर जोखीम निर्माण होत आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह सिस्टीम ही सातत्याने व्याज दर वाढवत आहे. आतापर्यंत त्यांनी ४.५ टक्के व्याज दर वाढवले आहे. गेल्या ४० वर्षात महागाई उच्चांक गाठला आहे. त्यामुळे व्याज दर अचानकपणे वाढवत आहे. हे सातत्याने सुरु आहे.

Live Blog | Thackeray Vs Shinde : आपण पुन्हा आयाराम-गयारामच्या युगात.. कोण एकनाथ शिंदे?

अमेरिका सरकारच्या गेल्या १७ वर्षातील ट्रेजरी नोट्सवर उत्पन्न (यील्ड) मार्च २०२३ मध्ये उच्च स्तरावर पोहोचले आहे. म्हणजेच ५.२५ टक्क्यांनी वाढलेला आहे. तर ३० वर्षातील उत्पन्न जवळजवळ २ टक्के वाढलेले आहे. जेव्हा-जेव्हा सुरक्षा ठेवीवरील उत्पन्न वाढलेले आहे. तेव्हा-तेव्हा किंमत उतरत गेली आहे. हे उत्पन्न अत्यंत कमी कालावधीत वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी वितरित केलेल्या तारखेला मार्केट किंमत मग ते कॉर्पोरेट बॉण्ड्स असू की सरकारी ट्रेजरी बिल्स हे घरसण्याचा वेग मात्र प्रचंड आहे. त्यामुळे याचा दीर्घकाळ परिणाम होणार असून नुकसान मोठे असणार आहे. उदा. ३० वर्षांच्या बॉण्ड उत्पन्नावर २ टक्के वाढल्यावर मार्केटमधील किंमत ३२ टक्क्यापर्यंत घसरू शकते. सिलिकॉन व्हॅली बँकेला याच कारणामुळे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या बँकेने आपल्या मालमत्तेतील एक मोठा हिस्सा ५५ टक्के अमेरिका सरकार बॉण्डसारखी निश्चित उत्पन्न सुरक्षा म्हणून गुंतवणूक केली होती.

परिपक्वता येण्यापूर्वी जर आधीच विक्री केली तर त्याचाही मोठा फटका बसू शकतो. व्याज दर जोखीम सुरक्षा ठेव मार्केट किंमत पडणे ही काही मोठी समस्या नाही. कारण गुंतवणूकदार हे परिपक्वता येईपर्यंत रोखून धरू शकतात. तोपर्यंत गुंतवणूकदारांना मार्केट फेसवॉल्यू मिळू सकते. परंतु, लक्षात न येणारे नुकसान हे बॅलन्स शीटमध्ये कळतेच. तसेच ते काही काळानंतर निघूनही जात असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असते. तेव्हा गुंतवणूकदारांनी परिपक्वता येण्यापूर्वी सुरक्षा ठेव विकली तर लक्षात न येणारे नुकसान हे खरोखर नुकसान होते. नेमकी हीच चूक सिलीकॉन व्हॅली बँकेने ही मोठी चूक या वर्षाच्या सुरुवातीला केल्याने बँक बुडण्याला कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे खातेदारांनी आपल्या खात्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली. खातेदारांना अधिक व्याज दर मिळुनही त्यांनी पैसे काढायला सुरु केल्याने याचा परिणाम नुकसानीत झाला आहे.

या सर्व परिणामामुळे सिलीकॉन व्हॅली बँक जेवढी कॅश खातेदारांना उपलब्ध करुन देऊ शकत होते. त्यापेक्षा जास्त थेट कॅश खातेदार काढू लागले. त्यामुळे खातेदारांना कॅश उपलब्ध करून देण्यासाठी सिलीकॉन व्हॅली बँकेने १.८ अब्ज डॉलरचे नुकसान सहन करून सुरक्षा पोर्टफोलिओमधून २१ अरब डॉलर विकण्याचा निर्णय घेतला. इक्वीटी भांडवल कोसळल्यानंतर बँकेने २ अरब डॉलरची नवीन कॅश जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्राहकांना देण्यासाठी तेवढी पुरेशी कॅश उपलब्ध होऊ शकली नाही.

परिणामी, ग्राहकांचा विश्वास उडाल्याने बँकेत खातेदारांनी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे चांगल्या सुस्थितीत असलेली बँक दिवाळखोरीत निघाली आहे.

बँक डुबण्यामागे आणखी एक कारण लोकांना आधीपासूनच माहिती होते. ते म्हणजे फेडरल डिपॉजिट कॉर्पोरेशनच्या वतीने २ लाख ५० हजारहुन अधिक यूएस डॉलर कॅश बँकेत जमा होती. त्यामुळे ग्राहकांना हे आधीच माहित झाले होते की, बँक दिवाळखोरीत निघाल्यावर त्यांचा पैसा परत मिळणार नाही. त्याचे कारण सिलीकॉन व्हॅल्यू बँकेत जवळपास ८८ टक्के रक्कमेची पॉलिसी (विमा) काढलेला नव्हती. हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

 

Tags

follow us