महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.
आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडली आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर केले जाईल. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी पुन्हा युक्तिवाद सुरू केला.
सुप्रीम कोर्टात सलग दोन आठवडे सुनावणी झाल्यानंतर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. कोर्टाकडून येणाऱ्या या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.
सुप्रीम कोर्टातील अपडेटसाठी
