Download App

Live Blog | सत्तासंघर्षावर आजची सुनावणी संपली, दिवसभरात काय घडलं?

  • Written By: Last Updated:

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

सुप्रीम कोर्टात सलग दोन आठवडे सुनावणी झाल्यानंतर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. कोर्टाकडून येणाऱ्या या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.

सुप्रीम कोर्टातील युक्तिवादाचे संपूर्ण अपडेट पाहा एका क्लिकवर

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Mar 2023 04:03 PM (IST)

    आजचा युक्तिवाद संपला

    सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील आजचा दिवस संपला आहे. आज शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या सकाळी पुन्हा सुनावणी सुरु होईल.

    उद्या सकाळी पहिल्यांदा तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडतील आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर केले जाईल.

    ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी पुन्हा युक्तिवाद करतील

  • 14 Mar 2023 03:59 PM (IST)

    अपात्रतेचा निर्णय सभागृहातच हवा

    महेश जेठमलानी म्हणाले की, “विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना कारवाईचा अधिकार राहत नाही. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी स्वत:च त्यावर निर्णय घेणे, न्यायसंगत नाही. येथे अधिकारंचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यासोबत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सभागृहातच व्हायला हवा.”

  • 14 Mar 2023 03:59 PM (IST)

    39 आमदारांना अपात्रतेची नोटीस नाही

    ठाकरे गटाकडून 39 बंडखोर आमदारांपैकी फक्त 16 आमदारांनाच मुद्दाम अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. सर्व 39 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली नाही. बंडखोर आमदारांमध्ये फूट पाडण्यासाठीच केवळ 16 जणांना नोटीस बजावली. काही आमदारांनी परत यावे, या हेतूनेच केवळ 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली.

  • 14 Mar 2023 03:59 PM (IST)

    जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या

    ठाकरे गटाच्या नेंत्यानी जाहीर विधान केली की मुंबईतच येताना तुमची प्रेतं येतील, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, आमदार तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आज केला गेला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपला युक्तिवाद करत आहेत. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर केवळ मेरिटवर म्हणणे मांडा, असे निर्देश घटनापीठाने दिले.

  • 14 Mar 2023 12:50 PM (IST)

    महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरु

    ठाकरे गटाचे तिसरे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरु

    नीरज कौल यांचा युक्तिवाद संपला

  • 14 Mar 2023 12:49 PM (IST)

    कौल यांचा युक्तिवाद संपला

    कौल यांचा युक्तिवाद संपला

    राज्यपाल त्यांच्या समोर आलेल्या माहितीवर निर्णय घेतात, त्यांच्याकडे निवडणूक आयोगाप्रमाणे तपासणी करायला यंत्रणा नसते

    त्यांच्याकडे आलेल्या माहितीवरच त्यांनी निर्णय घेतला, यात चूक काय

    उद्धव ठाकरे यांनी दहा मिनिटात राजीनामा दिला.

     

  • 14 Mar 2023 12:39 PM (IST)

    तर राज्यपाल सभागृहात बहुमत चाचणी घ्यायला सांगू शकतात.

    जर सरकारने बहुमत गमावलं असेल तर राज्यपाल सभागृहात बहुमत चाचणी घ्यायला सांगू शकतात.

    राज्यपाल राजभवनात आमदारांची मोजणी करत नाहीत, ते सभागृहातच चाचणी करायला सांगतात.

    नीरज कौल यांचा युक्तिवाद

  • 14 Mar 2023 12:13 PM (IST)

    नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात सवाल

    आज सर्वोच्च न्यायालय इतर सर्व घटनात्मक संस्थांना बाजूला सारून असं म्हणू शकतं का, की आम्ही या सर्व बाबींवर निर्णय घेणार?

    नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात सवाल

Tags

follow us