Tilak Bridge closed for traffic : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यासह राज्यातील इतर भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे विभागाला हवामान विभागाने पावसाचा अलर्टही जारी करण्यात आला. दरम्यान, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी पाणी पातळी वाढल्याने धरणातून विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळं पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि वाहतूक पोलिसांनी टिळक पूल (Tilak bridge) वाहतुकीसाठी बंद केलाय.
माजी उपराष्ट्रपती लपून का बसले, ते एकही शब्द का बोलू शकत नाहीत?, राहुल गांधींचा सरकारला सवाल
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होऊन पाणी पातळीत लक्षनीय वाढ झाली. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. टिळक पूल हा कमी उंचीचा असल्याने पाण्याची पातळी वाढल्यास पूल पाण्याखाली जाण्याचा धोका असतो. आताही खडकवासल्यातून सोडलेल्या विसर्गामुळे पुलापर्यंत पाणी आल्याने महापालिकेनं हा पूल बंद केला. यापूर्वी 25 जुलै 2024 रोजीही असाच निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, पुल बंद झाल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
निवडणूक आयोगावर शंका घेतली, नंतर माफीनामा! संजय कुमारांवर गुन्हा दाखल…
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आणि पाण्याचा धोका टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.