BBC : ‘विनाश काले विपरीत बुद्धी’, जयराम रमेश यांचा केंद्र सरकारवर निशाणा

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (BBC) च्या दिल्ली व मुंबईतील  ऑफिसवर आयकर विभागाने ( Income Tax )  छापा टाकला आहे. आयकर विभागाने ही धाड नसून सर्वेक्षण असल्याचे सांगितले आहे. यावरुन आता अनेकजण सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश ( Jairam Ramesh )  यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हणत, त्यांनी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (2)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (2)

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (BBC) च्या दिल्ली व मुंबईतील  ऑफिसवर आयकर विभागाने ( Income Tax )  छापा टाकला आहे. आयकर विभागाने ही धाड नसून सर्वेक्षण असल्याचे सांगितले आहे. यावरुन आता अनेकजण सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश ( Jairam Ramesh )  यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हणत, त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

यावर बोलताना जयराम रमेश म्हणाले, आम्ही अदानींच्या मुद्द्यावर जेपीसीची मागणी करत आहोत आणि सरकार इथे बीबीसीच्या मागे लागले आहे. विनाश काले विपरीत बुद्धी, असे म्हणत त्यांनी सरकावर निशाणा साधला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बीबीसीने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ ही डॉक्यूमेंट्री प्रदर्शित केली होती. यावरुन संपुर्ण देशभरात मोठे वादंग झाले होते. या डॉक्यूमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तर एसएफआय व एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांनी जेएनयु, व केरळमधील काही विद्यापीठांमध्ये ही डॉक्यूमेंट्री दाखण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन देखील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. दरम्यान या निर्णयाचे पडसाद कसे उमटतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.

Exit mobile version