Economist Raghuram Rajan : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्पासाठी संसदीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टला संपणार आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. (Raghuram Rajan) यावेळी सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मोदी सरकार युवक, कृषी आणि शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. अर्थसंकल्पापूर्वी अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.
उत्पादनाची शिडी चढणं कठीण
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, शाश्वत आर्थिक वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी भारताने उत्पादन क्षेत्राच्या विस्तारापेक्षा आपल्या सेवा क्षेत्राला प्राधान्य देणं आवश्यक आहे. वार्षिक जागतिक बँकेच्या परिषदेत बोलताना, ते म्हणाले की उत्पादन क्षेत्रात मर्यादित निर्यात आणि चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मेक्सिको सारख्या देशांकडून स्पर्धा यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. तसंच, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या, उत्पादनाची शिडी चढणे कठीण आहे असंही ते म्हणाले आहेत.
कौशल्य वाढवण गरजेच राहुल गांधींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रकरणी भिवंडी कोर्टाचा निर्णय रद्द
भारताने शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्याच्या गरजेवर भर देताना चांगल्या संधी मिळवण्यासाठी नाविन्य आणि सर्जनशीलता वाढवणं महत्त्वाचं आहे. रोजगार निर्मिती ही भारताची प्राथमिकता असायला हवी. अधिक नोकऱ्या ही काळाची गरज आहे. कारण नवीन नोकऱ्या आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी चिंतेचा विषय आहेत असंही राजन यावेळी म्हणाले आहेत. तसंच, भारत सरकारने केवळ उच्च पदांवरच नव्हे तर सर्व स्तरांवर रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं पाहिजे. कौशल्य वाढवून आणि प्रशिक्षण देऊन सध्याच्या नोकरीची उपलब्धता आणि भविष्यातील रोजगार संधी या दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.