Raghuram Rajan : ‘युवा भारतीयांची मानसिकता विराट कोहलीसारखी’; नक्की काय म्हणाले रघुराम राजन

Raghuram Rajan : ‘युवा भारतीयांची मानसिकता विराट कोहलीसारखी’; नक्की काय म्हणाले रघुराम राजन

Virat Kohli Mentality : केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचे कठोर टीकाकार म्हणून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन ओळखले (Raghuram Rajan) जातात. राजन यांनी भारतीय तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी असल्याचे म्हटले आहे. भारतीय उद्योजक आपला व्यवसाय सेट करण्यासाठी सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅली येथे जात आहेत. त्यांना आता विचारायला हवं की विदेशात असं काय आहे जे त्यांना तिथे व्यवसाय सुरू करण्यासाठी भाग पडते.

रघुराम राजन यांनी भारतीयांच्या मानसिकतेची तुलना विराट कोहलीशी केली. ते म्हणाले, भारतीय तरुण अशा ठिकाणी जात आहेत जिथे त्यांना शेवटच्या बाजारपेठेत प्रवेश करणे खूप सोपे वाटते. भारतीय उद्योजक आता सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीत का जात आहेत असे विचारले असता ते म्हणाले, त्यांना खरोखरच जागतिक पातळीवर अधिक विस्तार करायचा आहे. मला असं वाटतं की असा एक तरुण भारत आहे ज्याची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे की मी जगात कुणाच्याही मागे नाही.

चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे रघुराम राजन यांची खासदारकी धोक्यात

यानंतर त्यांनी देशातील बेरोजगारीवर भाष्य केले. आपल्याकडील लोकांमध्ये असलेल्या क्षमतांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सध्याच्या रोजगाराचे कल्चर बदलण्याचीही गरज आहे. या दोन्ही आघाड्यांवर आपल्याला काम करण्याची गरज आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेकिंग इंडिया अॅन अॅडव्हान्स्ड इकॉनॉमी बाय 2047: व्हॉट विल इट टेकमध्ये म्हटले की लोकतांत्रिक लाभांशाचा फायदा घेतला पाहिजे परंतु, समस्या ही आहे की आपण या गोष्टींचा फायदा घेत नाहीत.

आम्हाला त्यांना विचारण्याची गरज आहे की त्यांना भारतात राहण्याऐवजी बाहेर जाण्यास भाग पाडणारे काय आहे. पण यापैकी बरेच जण भारतात आनंदी नाहीत अशी खंत राजन यांनी यावेळी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube