चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे रघुराम राजन यांची खासदारकी धोक्यात

  • Written By: Published:
चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे रघुराम राजन यांची खासदारकी धोक्यात

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या खेळीमुळे मात्र, राज्यसभेवर सहावा उमेदवार पाठवण्याचा विचार करत असलेल्या मविआचं गणित पुरतं कोलमडलं असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांची खासदारकासाठीची उमेदवारी धोक्यात आली आहे. (Raghuram Rajan Rajya Sabha Seat In Trouble Due To Ashok Chavan)

Ashok Chavan : ‘मला वेगळा पर्याय शोधायचा; राजीनाम्यानंतर चव्हाणांच्या पोटातलं ओठावर आलंच…

देशात 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातून 2018 साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे.

‘नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात सोडचिठ्ठी’, आशिष देशमुखांची खोचक टीका

या रिक्त होणाऱ्या जागांवर भाजपकडून तीन, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रत्येकी एकएक असे पाच उमेदवार दिले जाणार आहे. तर, रघुराम राजन हे राज्यसभेसाठी मविआकडून इच्छूक होते. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटदेखील घेतली होती. काँग्रेस किंवा महाविकास आघाडी रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवू शकते अशी चर्चा होती. पण आता चव्हाण यांच्या राजीनामा खेळीमुळे राजन यांची खासदारकीसाठी उमेदवारी धोक्यात आली आहे.

Vishwajeet Kadam म्हणतात आपण राजीनामा दिला नाही पण कॉंग्रेसमध्ये राहण्यावर थेट उत्तर नाही

निवडणुकांपूर्वीच चव्हाणांनी साधली संधी

2018 मध्ये पार पडलेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी पार पडली होती. यावेळीदेखील मोठी खेळी झाली होती. यात शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्यात आले होते. यावेळी या निवडणुकीत सहावा उमेदवार हा मविआकडून किंवा एकट्या काँग्रेसकडून देण्याचा विचार केला जात होता. यासाठी राजन यांचे नाव चर्चेत होते. परंतु, उमेदवाराचे नाव आणि निवडणुकांपूर्वीच चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मविआ किंवा काँग्रेस आता उमेदवार उभा करणार का? आणि केलाच तर तो निवडणून येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘चव्हाणांच्या राजीनाम्याचा मविआवर विशेष परिणाम…’; प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या नेत्यांना व्हिपची भीती

दुसरीकडे, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटाकडून बंडखोर आमदार आणि खासदारांच्या अपात्रेवर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे अजितदादांसोबत गेलेले आमदार, खासदार कोणत्या पक्षाचा व्हिप पाळणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube