Belonging: A Journey of Love : पंतप्रधानपदावर असलेल्या सासू इंदिरा गांधी, पती राजीव गांधी यांच्या हत्येचे दु:ख पचविणाऱ्या, काँग्रेसला पुन्हा उभारी देणाऱ्या, यूपीएचा सरकार चालविण्यासाठी पडद्याआड राजकीय भूमिका पार पाडणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठा नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे आत्मचरित्र प्रकाशित आहे. बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ‘Belonging: A Journey of Love’ हे 10 नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे.
पेंग्विन रँडम हाऊसच्या (Penguin Random House) अल्फ्रेड ए. नॉफ ( Alfred A. Knopf ) हे पुस्तक प्रकाशित करत आहेत.
या आत्मचरित्रात 79 वर्षीय सोनिया गांधी यांनी नेहरू-गांधी राजकीय घराण्यात विवाह करून आल्यानंतरच्या आपल्या आयुष्यातील सुख-दुःखांचा, संघर्षांचा काळ उलगडून दाखविला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार का दिला ? यामागची कारणेदेखील या पुस्तकात देण्यात आलेली आहे.
सोनिया गांधी यांनी आपल्या इटलीतील बालपणापासून आत्मचरित्राची सुरुवात केली आहे. त्यानंतर केंब्रिजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबरची प्रेमकहाणी, विवाहानंतरचे आयुष्य आणि त्यानंतरचे राजकीय व कुटुंब प्रवास त्यांनी पुस्तकात मांडलेला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येने त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. या दोन्ही घटनांनंतरच आपण सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात प्रवेश केल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. हृदयद्रावक घटना आणि जवळच्या व्यक्तींच्या निधनामुळे मला राजकारणात यावे लागले, याच बरोबर खासगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्याबाबत सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात मांडणी केली आहे.
पैशांच्या खेळात रंगणार ‘अफरातफरी’! तगड्या कलाकारांच्या फौजेसोबत ‘अफरातफरी’चं मोशन पोस्टर प्रदर्शित!
नेहरू-गांधी कुटुंबातील वैयक्तिक नाती, राजकारणातील चढ-उतार, पती राजीव गांधी यांच्यासोबतचा प्रवास, पंतप्रधानपदाची संधी असताना ते न स्वीकारण्याचा निर्णय याचा उलघडाही सोनिया गांधी यांनी पुस्तकात केलाय.
आईच्या पुस्तकाबाबत राहुल गांधी काय म्हणाले ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर केलीय. त्यात राहुल म्हणतात, मी तुला आणि पप्पांना एकत्रपणे शेवटंचे 35 वर्षांपूर्वी पाहिलेले आहे. ज्या दिवसापासून पप्पा आपल्याला सोडून गेले, त्या दिवसापासून आयुष्याने तुझ्यावर उभ्या केलेल्या प्रत्येक आव्हानाचा तू अथक धैर्याने आणि सन्मानाने सामना करताना मी पाहिले आहे. तू काय-काय सहन केले आणि पप्पांनंतरचे तुझे आयुष्य किती कठीण होते, हे खरं तर फक्त प्रियंका आणि मला माहीत आहे. तुमची कहाणी — “Belonging: A Journey of Love” — अखेर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, याचा मला खूप आनंद आहे आणि तुमचा खूप अभिमानही वाटतो. तुमच्यासारख्या अत्यंत खाजगी स्वभावाच्या व्यक्तीसाठी आपली ही सुंदर कहाणी जगासमोर मांडणं किती कठीण होतं, हे मला माहीत आहे. आज, त्यांच्या वाढदिवशी, मी पप्पांना हसताना आणि त्यांच्या सुंदर सोनियाकडे अभिमानाने पाहताना पाहू शकतो.
प्रेमाने,
राहुल
