Bengaluru Techie BuffetGPT AI Tool : लग्नमंडपात वधू-वरांच्या अंगावर अक्षदा पडल्या की, पाहूणेमंडळींची रांग लागते ती, जेवणासाठी. आज प्रत्येक लग्ना एक दोन नव्हे तर, अनेक पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे जेवायला गेलेल्या पाहुण्यांसमोर मोठा प्रश्न असतो ते नेमकं खायचं काय? आणि किती प्रमाणात? तुम्हालाही असा प्रश्न कधी पडलाय का? पण आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण, बंगळुरूच्या एका हुशार पठ्ठ्यानं तयार केलेलं टूल किती आणि कोणते पदार्थ खायचे त्याबद्दल सांगणार आहे. नेमकं काय आहे बफेट GPT त्याबद्दल जाणून घेऊया…
कुणाच्याही लग्नाला गेलं की सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे काय खावे आणि काय सोडावे. याच तुम्हा आम्हा सर्वांना भेडसवणाऱ्या प्रश्नावर बंगळुरू येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर पंकज यांनी BuffetGPT नावाचे एक AI टूल तयार केले. तयार करण्यात आलेलं हे AI टूल तुम्हाला लग्नात शक्य तितक्या जास्त पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे सांगू शकते असे पंकज यांनी म्हटलयं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल एक पोस्ट देखील पोस्ट करण्यात आली आहे.
BuffetGPT म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
पंकज यांनी डेव्हलप केलेलं बुफे GPT संगणक व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण लग्नमंडपात असलेले बुफे काउंटर स्कॅन करते. स्कॅन केलेल्या माहितीच्या आधारावर तुम्ही समोर असलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ खाऊ शकता आणि कोण-कोणत्या पदार्थांचा किती प्रमाणात अस्वाद घेऊ शकता याबद्दलची रूपरेषा देते. पंकज यांनी तयार केलेले हे टूल एका मित्राच्या लग्नात वापरले असून हाती लागलेले रिझल्ट भन्नाट होते.
पंकजच्या या भन्नाट कल्पनेची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू असून एका यूजरने आतापर्यंत कुणाही न सोडवलेला गहन समस्या सोडवल्याबद्दल धन्यवाद मानले आहे. तर, दुसऱ्या एका यूजरने पंकजला केटरर रेटिंग तपासण्यासाठी एक फिचर जोडण्याचा सल्ला दिला आहे.
indian wedding buffet is a scam. i always leave regretting something. so i built BuffetGPT 😠
an ai agent that scans entire buffet and gives you a game plan.
it uses computer vision to detect every dish, then optimizes what to eat, what to skip, and how much based on actual… pic.twitter.com/yLxEf17LSJ
— Pankaj (@the2ndfloorguy) February 6, 2026
अशा प्रकारे हटके पण सर्वांना उपयोगी पडेल असे टूल डेव्हलप करण्याची ही पंकजची पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी त्याने एक असे AI डिव्हाइस तयार केले जे अन्य काम करता करताही ऑफिसची सर्व कामे झटक्यात करून टाकेल. तर मग वाट कसली बघताय पुढवेळी लग्नाला या असं आमंत्रण मिळालं की, ओढ ओरपून अन् काढ ढेकर देण्यासाठी सज्ज व्हा ते समोर कितीही पदार्थांची रेलचेल असली तरी ते पण कोणतही टेन्शन ने घेता…
