Download App

पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ अन् ‘इंडिया’ दोन्ही वापरणार; राज्यघटनेचा संदर्भ देत सकलानी यांचं मोठं विधान

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ लिहण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. मात्र, या सर्व वादात आता NCERT च्या संचालकांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये नेमका कोणता शब्द वापरायचा यावरील चर्चा निरूपयोगी असल्याचेही दिनेश प्रसाद सकलानी यांनी म्हटले आहे. (‘Bharat’ and ‘India’ Both Words To Be Used Interchangeably In Textbooks Say’s NCERT Director)

अयोध्येचा अध्याय बदलला; राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास; NCERT वर संतापले

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी सांगितले की, देशाच्या राज्यघटनेप्रमाणेच NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये “भारत” आणि “इंडिया” या दोन्ही शब्दांचा वापर केला जाणार आहे. NCERT सर्व वर्गांच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ शब्दाऐवजी ‘भारत’ असा शब्द वापरावा अशी शिफारस सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमावर काम करणाऱ्या उच्च-स्तरीय पॅनेलने केली होती. त्यांच्या या शिफारसीनंतर सकलानी यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

एनसीईआरटी प्रमुख म्हणाले की, भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द पाठ्यपुस्तकांमध्ये वापरले जाणार असून, इंडिया आणि भारत यापैकी कोणत्याही शब्दाचा NCERT चा तिरस्कार करत नसल्याचे ते म्हणाले. राज्यघटनेत दोन्ही शब्दांचा उल्लेख आहे त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये भारत किंवा इंडिया कोणताही शब्द वापरला तर काय हरकत आहे? असा प्रश्न सकलानी यांनी उपस्थित केला.

समितीने शिफारस करताना काय सांगितले होते?

NCERT च्या सर्व वर्गांच्या पाठपुस्तकांमध्ये इंडिया ऐवजी भारत शब्द वापरावा अशी शिफारस सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमावर काम करणाऱ्या उच्च-स्तरीय पॅनेलने केली होती. ही शिफारस करताना पॅनलने भारत हे जुने नाव असून, ते 7000 हजार वर्षापूर्वीच्या विष्णु पुराणातही वापरण्यात आले आहे असे सांगितले होते. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. परंतु, पॅनलने केलेल्या शिफारसीवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यावेळी NCERT ने सांगितले होते.

मोदी सरकार नव्हे तर, NDA सरकार; बहुमताला हुलकावणी मिळताच मोदींची भाषा बदलली

G20 च्या आमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला होता उल्लेख 

समितीने केलेल्या शिफारसीनंतर ‘भारत’ या शब्दाचा पहिल्यांदा वापर गेल्या वर्षी देशात पार पडलेल्या G 20 च्या आमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला होता. यात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ असे लिहिण्याऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे नमुद करण्यात आले होते.

follow us