Download App

Bharat Jodo Yatra : तिरस्कार संपेल आणि प्रेमच सर्वांना जोडेल, प्रियंका गांधींचा विश्वास

श्रीनगर : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये सांगता झाली. यावेळी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बर्फवृष्टी होत असताना भाषण केलं. त्या म्हणाल्या, ‘आज देशात जे राजकारण सुरू आहे. त्याने देशाचं भलं नाही तर हे तोड-फोड आणि तिरस्कारचं राजकारण आहे.’

‘मला आशा आहे की, हा तिरस्कार संपेल आणि फक्त प्रेमच सर्वांना जोडेल. या देशाचा पाया सत्य, अहिंसा आणि प्रेमाच्या आधारावर घातला गेला आहे आणि तो आम्ही कायम ठेवू. मी सर्वांचे आभार मानतो की, आज माझ्या देशात एक प्रकाशकिरण पेटला आहे. प्रवासात प्रकाशाचा किरण दिसला.’

त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या ‘माझा भाऊ काश्मीरवरून येत असताना त्याने मला आणि माझ्या आईला संदेश पाठवला होता. की, मला खूप अनोखा अनुभव येत आहे. मला वाटतय मी माझ्या घरी जात आहे.’ ‘माझा भाऊ कन्याकुमारीपासून जम्मू-कश्मीरपर्यंत 4-5 महिने पायी चालला. तो जिथे जातो तिथे लोक त्यांच्यासोबत चालायला लागत होते. का ? कारण देशातील लोकांना अजूनही देश, जमीन, आणि विविधतेबद्दल आदर आहे. हा आदर भारतीयांच्या ह्रदयात आहे. आम्ही जेथे जेथे गेलो तेथे लोकांनी आम्हाला प्रेम दिलं. जम्मू काश्मीरच्या जनतेनेही आम्हाला प्रेम दिलं.’

यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या उपस्थितीत राष्ट्र ध्वज फडकवण्यात आला. त्याचबरोबर श्रीनगरमध्ये प्रदेश कॉंग्रेस कमिटी (पीसीसी) मुख्यालयात 4,080 किलोमीटर पायी यात्रेचा समारोप करण्यात आला. शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एक रॅली झाली, जिथे काँग्रेस नेत्यांसह DMK, नॅशनल कॉन्फरन्स, PDP, CPI, RSP आणि IUML यासह अनेक विरोधी नेते मोर्चात सामील झाले.

Tags

follow us