Download App

‘टी- शर्टचा पांढरा रंग लाल करण्याची संधी, Rahul Gandhi यांचं खोचक वक्तव्य

श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) समारोपावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पावसाच्या दरम्यान भाषण केलं. या काळात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पायी प्रवास करण्याच्या निर्णयाबाबतही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, येथून प्रवास सुरू करण्यापूर्वी मला भीती दाखवण्यात आली. सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा होती. पण इथे आल्यानंतर काश्मिरियतचा अर्थ काय आहे हे कळले. राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या जनतेने मला हँडग्रेनेड दिले नाही, तर उघड्या हाताने प्रेम दिले. मी इथे चार दिवस टी-शर्ट घालून फिरलो आणि आव्हान दिले, की तुमच्यात हिंमत असेल तर त्याचा पांढरा रंग लाल करा. राहुल गांधी म्हणाले की, मी ठरवले होते की मी चालणार, त्यामुळे अनेकांनी मला घाबरवले.

काँग्रेस खासदार म्हणाले की येथे तैनात असलेल्या सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांना सांगू इच्छितो की, मला हिंसा समजते. ज्यांनी ते पाहिले नाही त्यांना ते समजणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसचे लोक हे समजू शकत नाहीत. आम्ही इथे ४ दिवस फिरलो. भाजपचा कोणताही नेता असा चालणार नाही याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर ते घाबरले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी १४ वर्षांचा होतो आणि शाळेत भूगोलाच्या वर्गात होतो. तेवढ्यात माझे एक शिक्षक जवळ आले आणि म्हणाले की तुम्हाला मुख्याध्यापकांनी बोलावले आहे. मी प्रिन्सिपल कडे पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितले कि घरून फोन आला आहे. मी बोललो तेव्हा माझ्या आईसोबत काम करणारी बाई जोरात ओरडली.

मी जे बोलतोय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा समजणार नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. पण काश्मीरचे लोक, आर्मी आणि सीआरपीएफचे लोक ते समजू शकतात. पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या हृदयात काय गेले ते मला माहीत आहे. येथे काश्मिरी लोक मारले जातात तेव्हा काय होते हे मला आणि माझी बहिणीला चांगले समजते. काल एका पत्रकाराने विचारले की तुम्हाला यात्रेतून काय साध्य करायचे आहे. एखाद्याच्या मृत्यूची बातमी आल्यावर असे फोन कॉल्स थांबवणे हे यात्रेचे ध्येय आहे.

देशाचा पाया असलेली विचारधारा मजबूत करण्यासाठी आम्ही ही यात्रा काढल्याचे राहुल गांधी म्हणाले. मला माहित आहे की जर आपण प्रेमाने उभे राहिलो आणि प्रेमाने बोललो तर आपण यशस्वी होऊ. आम्ही त्यांच्या विचारसरणीचा पराभव तर करूच पण ती त्यांच्या मनातून काढून टाकू. भाजपने जगण्याचा राजकीय मार्ग दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरा मार्ग दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो म्हणजे प्रेमाचा आणि भारताचा मार्ग. आम्ही एक छोटेसे पाऊल उचलले आहे आणि द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्याचा आमचा छोटासा हा प्रयत्न आहे.

Tags

follow us