Download App

राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक, पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यात एसयूव्हीची फुटली काच

Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं काय झालं? जाणून घ्या…

मालदाच्या हरिश्चंद्रपूरमध्ये हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत राहुल गांधी प्रवास करत असलेल्या गाडीच्या मागची काच फुटली. या घटनेत राहुल गांधींना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत ही दिलासादायक बाब आहे.

कटिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याबद्दल काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, जमावातून कोणीतरी मागून दगडफेक केली असावी. याकडे पोलीस दलाचे दुर्लक्ष होत आहे. बरेच काही होऊ शकते. ही एक छोटीशी घटना आहे पण काहीही घडले असते.

अधीर रंजन चौधरी यांना विचारले की, राहुल गांधींच्या गाडीची काच कोणी फोडली? त्यावेळी त्यांनी सांगितले की, ज्यांना काच तोडायची होती त्यांनी तसे केले, सांगण्यासारखं काही नाही. आम्ही जे इथे आलो आहोत ते कॅम्प केले आहेत. आम्हाला राहुल गांधींना जेवण देण्यासाठी जागाही मिळाली नाही.

आम्ही राहुल गांधी यांना दुपारचे जेवण करण्यासाठी इरिगेशनच्या बंगल्यासाठी विचारणा केली होती. आम्हाला तिथे त्यांनी परवानगी दिली नाही. त्यामुळेच आम्हाला इथे कॅम्प लावावा लागला, वाटेत जिथे जिथे ध्वज लावला तिथे आम्ही आमचा झेंडा लावला असेही त्यांनी सांगितले.

घडलं असं की, बिहारमधील कटिहार येथून बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा मालदामार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांवरून हळूहळू जात असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकलच्या (एसयूव्ही) छतावर राहुल गांधी बसलेले होते. त्यानंतर काही समाजकंटकांनी ही घटना घडवून आणली. या घटनेच्या मागे सत्ताधारी म्हणजे तृणमूल कॉंग्रेसचा संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी पश्चिम बंगाल प्रशासनाने राहुल गांधींना मालदा जिल्ह्यातील भालुका इरिगेशन बंगल्यात राहण्याची परवानगी दिली नव्हती. या कारणामुळे काँग्रेसला वेळापत्रकात फेरफार करावा लागला आणि याआधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, बंगालमधील प्रस्तावित न्याय यात्रेबद्दल काँग्रेसने त्यांना काहीही सांगितले नव्हते.

follow us