उत्तर प्रदेश हादरलं! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्यावर गोळीबार

आझाद समाज पक्ष (कांशीराम) आणि  भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सहारनपूरमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गाडीतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबर केला. मिळालेल्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत असल्यानुसार गोळी त्यांच्या कमरेला चाटून गेल्याच दिसत […]

Chandrashekhar Aazad Ravan

Chandrashekhar Aazad Ravan

आझाद समाज पक्ष (कांशीराम) आणि  भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सहारनपूरमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गाडीतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबर केला.

मिळालेल्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत असल्यानुसार गोळी त्यांच्या कमरेला चाटून गेल्याच दिसत असून त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. यासोबतच वाहनांच्या काचाही तुटलेल्या दिसत आहेत. हल्ल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bhim Army chief Chandrashekhar Azad fired in Uttar Pradesh)

या संपूर्ण प्रकरणाबाबत सहारनपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. विपिन टाडा यांनी घटनेची माहिती घेतली असून तपासाच्या सुचना दिल्या आहेत. भीम आर्मीने आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचीही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक दलचे स्थानिक आमदार मदन भैया यांनी सांगितल्यानुसार चंद्रशेखर आझाद यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version