Download App

Hathras Stampede Case : मोठी बातमी! हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात भोले बाबाला क्लीन चिट

Hathras Stampede Case :  हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात भोले बाबा यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घटना घडली

  • Written By: Last Updated:

Hathras Stampede Case :  हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात (Hathras Stampede Case) भोले बाबा (Bhole Baba) यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घटना घडली आणि अनेकांचा मृत्यू झाला असं एका अहवालात सांगण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटीने (SIT) आपल्या अहवालात भोले बाबाला क्लीन चिट दिली आहे आणि अपघातासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात 121 जणांचा मृत्यू झाला होता.

एसआयटीच्या अहवालाच्या आधारे, उत्तर प्रदेश सरकारने उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), पोलिस सर्कल ऑफिसर (सीओ), तहसीलदार, पोलिस स्टेशन प्रभारी आणि सिकंदररावच्या दोन चौकी प्रभारींसह सहा अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे आणि त्यांना निलंबित केले आहे. अहवालात असे नमूद केले आहे की स्थानिक प्रशासनाने कार्यक्रम गांभीर्याने घेतला नाही आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित केली नाही, त्यानंतर ही दुर्घटना घडली.

नेमकं प्रकरण काय?

हाथरस जिल्ह्यातील मुगल गढी गावात 2 जुलै 2024 रोजी आयोजित सत्संगात सहभागी होण्यासाठी लोकांचा मोठा जमाव पोहोचला होता. मात्र तेथे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि यात 121 लोकांचा मृत्यू झाला होता तर 150 जास्त लोक जखमी झाले होते. कार्यक्रम सूरज पाल यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता ज्यांना नारायण साकार हरी किंवा भोले बाबा म्हणूनही ओळखले जाते.

मोठी बातमी! बॉम्बस्फोटांनी इस्रायल हादरले, बसेसमध्ये एकामागून एक स्फोट

कार्यक्रम संपल्यानंतर अचानक चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती.

follow us