Download App

ECI चा मोठा निर्णय; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवलं

Election Commission of India : लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानं (Election Commission)देखील कात टाकल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक आयोगामध्येही अनेक बदल केले जात आहेत. त्यातच आता निवडणूक आयोगाने आज सोमवारी गुजरात, यूपी, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवले आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे पोलीस प्रमुख यांना देखील हटवलं आहे. यात विशेष बाब म्हणजे बृहन्मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal)यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश दिले आहेत.

मतांसाठी ठाकरे राहुल गांधींना शरण; बदललेल्या भाषणाच्या स्टाईलवरून भाजपनं संधी साधली

मुंबई महानगरपालिकेचे (Mumbai Municipal Corporation)आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली आहे. चहल यांची बदली रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मागणी करण्यात आली होती. पण राज्य सरकारच्या (State Govtया मागणीला निवडणूक आयोगानं केराची टोपली दाखवली आहे.

Viral: प्रेरणा अरोरा आणि दिव्या खोसला यांच्यातील फोन कॉल झाला व्हायरल

राज्य सरकारकडून आयुक्त इक्बाल चहल यांची बदली टाळण्यासाठी तीन वर्षांचा नियम लागू करु नये अशी मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.

अर्थातच राज्य सरकारची ही मागणी फेटाळल्यामुळे आता मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि दुसऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच ठिकाणी पदांवर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश दिला आहे. या नियमांतर्गत इक्बाल चहल यांच्यासह मुंबई महापालिकेच्या इतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होणं अटळ आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. आता गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांचे गृहसचिव हटवण्याचे आदेश दिले. त्यासोबतच पश्चिम बंगालच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनाही हटवले आहे.

follow us