Download App

हवाई दलाचा मोठा निर्णय; वारंवार होणाऱ्या अपघातानंतर MIG-21 च्या उड्डाणावर बंदी

MIG-21 flying banned : 1963 मध्ये हवाई दलात सामील झालेल्या मिग-21 विमानांची (Mig-21 aircraft) सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. MIG-21 विमानांचे उड्डाण करताना भारतीय हवाई दलाला (indian air force) वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत होते. हे अपघातांचे सखोल संशोधन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच राजस्थानमध्ये MIG-21 विमान कोसळले होते, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, ही बंदी कायमस्वरूपी लागू करण्यात आलेली नाही.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मिग-21 लढाऊ विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. राजस्थानमध्ये दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने मिग-21 विमानांचे उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत विमानाचे तिन्ही स्क्वाड्रन उडणार नाहीत. मिग प्रकारांचा पहिला ताफा 1963 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतरच्या दशकात भारताने 700 हून अधिक मिग-व्हेरियंट विमाने खरेदी केली.

भारत क्वाड शिखर सम्मेलनाचे यजमानपद भूषवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

IAF ला त्यांची जुन्या लढाऊ विमानांच्या ताफ्याला बदलण्यात मदत करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 48,000 कोटींचा करार केला आहे. IAF मल्टी-रोल 114 लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. MIG-21 हे 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला हवाई दलात समाविष्ट झाल्यापासून आतापर्यंत 400 विमानांचे अपघात झाले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज