Download App

Dearness Allowance : कर्नाटकात काँग्रेस सरकार येताच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट…

Image Credit: LetsUpp

Dearness Allowance : कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर लगेचच सरकारी कर्माचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यामध्ये तब्बल 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.

ही वाढ फक्त सरकारी कर्मचारीच नाहीतर पेंन्शनधारकांनाही देण्यात आली आहे. पेन्शनधारकांच्याही महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून महागाई भत्ता आता एकूण 35 टक्के इतका देण्यात येणार आहे.

Delhi Murder Case : क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपी साहिलचं धक्कादायक विधान, म्हणाला…

वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनामध्ये वाढ होणार असून यापूर्वी हरियाणा सरकारने डीएमध्ये ४ टक्के वाढ केली होती. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केलेला आहे. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ होत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज