Download App

मोठी बातमी! आधार-पॅन कार्ड लिंकिंगबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : आधार कार्ड व पॅन कार्ड (PAN-Aadhaar) लिकिंगबाबत सरकारने मोठी माहिती दिली आहे. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत होती. मात्र आता सरकरने नागरिकांना दिलासा देत यामध्ये मुदतवाढ दिली आहे. आधार व पॅन लिंकिंगसाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने ( CBDT) याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

तीन महिन्यांची मुदतवाढ
पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करण्यासाठीची अंतिम मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्च 2023 ही तारीख अंतिम होती. मात्र आता लिंकिंगसाठी तब्बल तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड 30 जून 2023 पर्यंत लिंक करता येणार आहेत. मात्र निश्चित तारखेपर्यंत लिंकिंग न केल्यास तुमच्या पॅन कार्डचा काहीही उपयोग होणार नाही. दरम्यान आर्थिक कामासाठी पॅन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे,

मुदतवाढ मात्र दंडाची रक्कम कायम…
आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली असली तरी दंडाची रक्कम कायम ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी अद्याप आधार-पॅन लिंक केलेले नाही, ते 1000 रुपये भरून ते लिंक करू शकतील.

तर 10 हजारांचा दंड होऊ शकतो
पॅन कार्ड बंद पडल्यावर तुम्ही कोणत्याही आर्थिक कामासाठी हे कागदपत्र म्हणून वापरू शकत नाही. तरी मात्र तुम्ही हे कागदपत्र म्हणून वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

सोशल मीडियावर पोस्ट करताय तर सावधान… पोलिसांचा असणार वॉच!

अशा पद्धतीने पॅन – आधारशी लिंक करा
प्रथम Incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जाऊन लिंक आधार पर्याय निवडा.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रथम तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाकावा लागेल.
त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाका आणि नंतर आधार कार्डवरील नाव टाका.
वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर, खाली दिलेला पडताळणी कोड टाका आणि ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमचे आधार कार्ड पॅनशी लगेच लिंक केले जाईल.
आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला वन टाईम पासवर्ड मिळेल.
तुम्हाला तो पासवर्ड टाकावा लागेल आणि पुढे जावे लागेल. linking deadline extended till June 30, 2023

Tags

follow us