Download App

वाहनधारकांसाठी खुशखबर: सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घट

CNG-PNG price Reduce: सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी घट झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. अदानी टोटल गॅस आणि महानगर गॅसने त्यांच्या किंमती कमी केल्या आहेत. सीएनजीच्या दरात आठ रुपयांनी, तर पीएनजीच्या दरात पाच रुपयांनी घट झाली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडने पीएनजीच्या किमतीत 8.13 रुपये प्रति किलो आणि 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कपात केली आहे.

अदानी टोटल गॅस लिमिटेडने शुक्रवारी 19 क्षेत्रांमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमती कमी केल्याची घोषणा केली. नवीन दर अद्ययावत करण्यात आले आहेत. नैसर्गिक वायूच्या किंमतीतील ही कपात 8 एप्रिल 2023 पासून लागू झाली आहे.

महिना उत्पन्न ५३ हजार रुपये… आयकरने धाडली ११३ कोटींची नोटीस!

दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी ही माहिती दिली की, आता घरगुती गॅसच्या किंमती आंतरराष्ट्रीय गॅस हब ऐवजी इंपोर्टेड क्रूडसोबत लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे आता सीएनजी-पीएनजीच्या किंमती तब्बल 10 टक्क्यांनी कमी होणार आहेत. त्याचबरोबर आता पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसप्रमाणे सीएनजी-पीएनजीच्या किंमतीही दर महिन्याला बदलणार आहेत.

घरगुती गॅसच्या किंमतींसाठी ऑक्टोबर 2014 मध्ये गाईडलाईन ठरवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारामधील किंमतींच्या आधारे देशात घरगुती गॅसच्या किंमती ठरत होत्या. आता सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये किरीट पारिख यांच्या अध्यक्षतेखाली समीती बनवली होती. त्यांनी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार घरगुती गॅसच्या किंमती आंतरराष्ट्रीय गॅस हब ऐवजी इंपोर्टेड क्रूडसोबत लिंक करण्यात आले आहे.

Tags

follow us