महिना उत्पन्न ५३ हजार रुपये… आयकरने धाडली ११३ कोटींची नोटीस!

महिना उत्पन्न ५३ हजार रुपये… आयकरने धाडली ११३ कोटींची नोटीस!

Income Tax Notice : मध्य प्रदेश येथील भिंड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे दरमहा उत्पन्न ५३ हजार रुपये आहे. मात्र, त्याला आयकर विभागाने १३२ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासाठी तब्बल ११३ कोटी ८३ लाख रुपयांची नोटीस धाडली आहे. या नोटीसीविरोधात तो गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ संघर्ष करत आहे. मात्र, यंत्रणा त्याची दखल घेत नाही.

मध्य प्रदेश येथील भिंडचे रहिवासी असलेल्या रवी गुप्ता यांच्या नावाने सुरत आणि मुंबई येथे फर्म म्हणून तिया ट्रेडर्स या हिरे-व्यापार कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच गुप्ता यांच्याकडे कर ओळख क्रमांक (टीआयएन) नोंदणी, सेवा कर नोंदणी, आरबीएल बँकेच्या तिया ट्रेडर्सचे चेक तपशील आणि मालाड, मुंबई शाखेत उघडलेले अॅक्सिस बँक खाते देखील आहे, असे आयकर विभागाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

याबाबत रवी गुप्ता यांनी सांगितले की, पॅन कॉपी आणि त्याचे छायाचित्र वगळता दुसरे काहीही माझे नाही. एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटचा मी बळी ठरलो आहे. या नोटीसीविरोधात तो गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ संघर्ष करत आहे. मात्र, यंत्रणा त्याची दखल घेत नाही.

२०२० मध्ये एएनआयने पहिल्यांदा रिपोर्ट दिल्यानंतर पीएमओने रवी गुप्ताच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. असे असूनही, गुप्ता यांना २८ मार्च रोजी आयकर विभागाकडून आणखी एक नोटीस पाठवण्यात आली आहे.

गुप्ता म्हणाले, सुरुवातीला २०१९ मध्ये आयकर विभागाकडून नोटीस मिळाली होती. ज्यात २०११-१२ या वर्षासाठी ३ कोटी ४९ लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश देण्यात आला होता. तेव्हा इंदूरमधील बीपीओमध्ये मी काम करत होता आणि मला फक्त ७ हजार रुपये मासिक पगार मिळवत होता. त्यामुळे आयकर विभागाकडून मला चुकून नोटीस पाठवण्यात आली आहे. मी आयकर विभागाला तेव्हा याबाबत कळवले होते. तसेच दुरुस्ती करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा मला तब्बल ११३ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपयांची नोटीस जेव्हा मिळाली. तेव्हा मला जबर धक्का बसला. याविषयी केंद्रीय एजन्सीकडे गेल्या पाच वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहे. यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

NCP Breaking : राष्ट्रवादीचा ‘दादा’ नेता सात आमदारांसह नॉट रिचेबल? – Letsupp

परंतु, अशाच प्रकारची प्रकरणे उघडकीस येऊनही वरील संस्थांनी या प्रकरणाचा अद्याप तपास केलेला नाही, याचे आश्चर्य वाटते, असे गुप्ता यांनी सांगितले. आता सीबीआय भोपाळ कार्यालयाने माझी तक्रार आर्थिक गुन्हे शाखा (EoW) ग्वाल्हेरकडे पाठवली आहे. मला विश्वास आहे की EoW या प्रकरणाची चौकशी करत आहे. परंतु, EoW द्वारे तपास सुरू असताना आयकर विभागाने पुन्हा मागील आठवड्यात नोटीस धाडली आहे. आता या नोटीसविरुद्ध न्यायालयात अपील करण्याशिवाय पर्याय नाही.कारण, वारंवार येणाऱ्या या नोटिसा माझ्यासाठी मानसिक छळापेक्षा कमी नाहीत. माझ्यासारखे इतरही अनेक असतील. हे कधी आणि कुठे थांबेल हे मला माहीत नाही, अशी खंत रवी गुप्ता यांनी व्यक्त केली.

याबाबत आणखी माहिती देताना रवी गुप्ता यांनी सांगितले की, इंदूर येथील बीपीओमध्ये काम करत असताना त्यांच्या अन्य दोन सहकारी कपिल शुक्ला आणि खंडवाचे प्रवीण राठौर यांना २०११-१२ साली अशाच प्रकारच्या आयकर विभागाच्या नोटिसा मिळाल्या होत्या. त्या नोटीसमध्ये वर नमूद केलेल्या कालावधीत कराची रक्कम न भरल्यास तुम्हाला कलम २२१ नुसार सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर दंड (जो थकबाकीच्या कराच्या रकमेइतका असू शकतो) लादला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता. तसेच जर तुम्हाला मूल्यांकनाविरुद्ध अपील करायचे असेल तर तुम्ही प्राप्तिकर कायदा १९६१ च्या अध्याय XX च्या भाग A अंतर्गत, राष्ट्रीय फेसलेस अपील केंद्राकडे (NFAC) प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अपील सादर करू शकता, असे देखील सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube