Download App

Gautam Adani यांना मोठा धक्का ! श्रीमंतांच्या यादीतून टॉप-20 च्याही बाहेर

  • Written By: Last Updated:

Hindenburg Research चा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी घसरण होत आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 100 बिलियन डॉलरने घसरले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉकमध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानींच्या (Gautam Adani) साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. तो धक्का अजूनही सावरला जात नाही, प्रत्येक दिवस त्याच्या संपत्तीत मोठी घसरण आणत आहे. ताज्या माहितीनुसार गौतम अदानी जगातील सर्वाधिक 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

२४ तासात १६व्या क्रमांकावरून २१ व्या स्थानी

गौतम अदानी गुरुवारी 64.7 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर होते आणि अवघ्या 24 तासांत ते आणखी पाच स्थानांनी घसरून 21 व्या क्रमांकावर आले आहेत. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत वाईट ठरत आहे.

“हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल खोटा असून हा भारताविरुद्धचा कट आहे” अस स्पष्टीकरण अदानीग्रुपकडून दिल असलं तरी अदानी ग्रुप गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरलं आहे. दोन दिवसापूर्वी अदानी एंटरप्रायझेसचा 20,000 कोटी रुपयांचा एफपीओही त्यानी रद्द केला.गौतम अदानी यांनी स्वत: एक निवेदन जारी करून गुंतवणूकदारांना समूहावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यांच्या आवाहनाचा गुंतवणूकदारांवर काहीही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.

दहापैकी नऊ शेअर्स घसरले

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बुधवारी २५% घसरले आणि तर काल ते २१% घसरून १६७८ रुपयांवर आले आहेत. गेल्या पाच वर्षांत स्टॉक ८०० टक्‍क्‍यांनी वाढला होता परंतु पाच दिवसांत ४० टक्‍क्‍यांहून अधिक घसरला आहे.

त्याचप्रमाणे अदानी पॉवरमध्ये पाच टक्के, अदानी पोर्ट्समध्ये ३.७४ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये १० टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये १० टक्के, एसीसी लि. लि. ०,२९ टक्के, अदानी ट्रान्समिशन १० टक्क्यांनी, एनडीटीव्ही पाच टक्क्यांनी आणि अदानी विल्मार पाच टक्क्यांनी घसरले आहेत. फक्त अंबुजा सिमेंट्स 3.12 टक्क्यांनी वाढला होता. या सर्व कंपन्यांचे शेअर्स बुधवारी घसरले होते.

Tags

follow us