Unnao Rape Case: देशभर गाजलेल्या उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तत्कालीन भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगरला (Kuldeep Sengar) अटक झाली होती. सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली होती. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने (Supreme Court) या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा शिक्षा स्थगितीचा आदेश रद्द केलाय.
सरन्यायाधीश सूर्य कांत ( Surya Kant) आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची (Joymalya Bagchi) यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाला दोन महिन्यांच्या आत या प्रकरणावर नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आपला नवीन निर्णय घेताना उच्च न्यायालयाने पूर्वीचा आदेश रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचा प्रभाव पडू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय.
कांद्याचे दर कोसळले; ट्रॅक्टर व कांद्यासह नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको
उत्तर प्रदेशमध्ये गाजलेले प्रकरण काय आहे ?
जून 2017 मधील ही घटना आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर याने नोकरीचे आमिष दाखवून घरी बोलावून बलात्कार केल्याचा आरोप एका १७ वर्षीय मुलीने केला होता. आमदाराच्या प्रभावामुळे पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नाही. मार्च ते एप्रिल 2018 दरम्यान वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पीडितीने लखनौमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्यानंतर 9 एप्रिल 2018 रोजी सेंगर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या काळात, पीडितेच्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आले, जिथे एप्रिल 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. जुलै 2018 मध्ये कुलदीप सिंग सेंगर याला अटक करण्यात आली.
निवडणुकीत तोंडावर आपटले ते अपयश झाकण्यासाठी… मंत्री विखेंचा मोदींवरील टीकेवरून विरोधकांना टोला
पीडितेच्या दोन नातेवाइकांचा अपघाती मृत्यू
भाजपने सेंगर याला पक्षातून काढून टाकले. त्यानंतर जुलै 2019 मध्ये, पीडिता, तिचे वकील आणि तिच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या कारला एका ट्रकने धडक दिली, ज्यात पीडितेच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी याला एक सुनियोजित कट असल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण खटला दिल्लीत वर्ग केला. डिसेंबर 2019 मध्ये, दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने कुलदीप सिंग सेंगरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच 25 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. वडिलांच्या मृत्यूप्रकरणी त्याला अतिरिक्त 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली.
