Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला (NDA) घवघवीत यश मिळाले आहे. भाजप सर्वाधिक 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. तर 85 जागा जिंकून नितीशकुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू हा पक्ष लहान भाऊ ठरला आहे. पण लहान भावावर लोकसभेचे गणित अंवलबून आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. नव्या सरकारसाठी नितीश कुमार आजच भाजपसोबत बैठक करणार असून येत्या 20 तारखेला शपथविधी घेणार असल्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील दौऱ्यात दानवे माणसं शोधत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठं यश मिळालंय, तर त्यापाठोपाठ नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाला 85 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता पेच होता तो मुख्यमंत्रिपदाचा. बिहारमध्ये सर्वाधिक जागा निवडून आल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आजच नितीश कुमार कॅबिनेटनंतर राजीनामा देणार असून नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत बैठक करणार असल्याची माहिती समोर आलीयं. त्यामुळे पुन्हा बिहारमध्ये नितीश राजच येणार असल्याचं बोललं जातंय.
अहिल्यानगरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई, ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश
विधानसभेचा निकाल जाहीर होऊन दोन-चार दिवस झाले आहेत. परंतु मुख्यमंत्रीपदावर कोण बसविणार याबाबत अद्याप तरी चर्चा बाहेर आलेली नाही. जेडीयूने एक ट्वीट करत नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे म्हटलं होतं. पण काहीच वेळात हे ट्वीट हटविण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या जदयूचे लोकसभेत बारा खासदार आहे. मोदी यांच्या सरकारसारखी बारा खासदार महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते नितीशकुमार यांना सहजासहजी दुखविणार नाहीत. नितीशकुमार यांचे सुशासन बाबू धोरणामुळे एनडीएला हे यश मिळाले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, बीड विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा
आता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपला आपला मुख्यमंत्री विराजमान करायचा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याचनुसार बिहारचा मुख्यमंत्री निवडला जाऊ शकतो. परंतु बिहारचे राजकारण वेगळे आहे. तेथे नितीश कुमारांचा जास्त होल्ड आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमारांना बाजूला करण्याची रिस्क घेईल का हा मोठा प्रश्न आहे. जर नितीशकुमार हे मुख्यमंत्री झाले तर हा विक्रम असेल. कारण ते दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.
बिहारमध्ये जातीचे गणितही इतर राज्यांपेक्षा वेगळं आहे. जात फॅक्टरबघून मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. भाजपचा विजयकुमार सिन्हा हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत. ते भूमिहारचा चेहरा आहेत. ते विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच राम कृपाल यादव यांच्यादेखील नावाची मुख्यमंत्रिपदासाठी होती. तेही दिग्गज राजकारणी असून मध्य प्रदेशात भाजपने यादव यांना मुख्यमंत्री केले आहेत. तर दुसरीकडे महिला वर्गातून रेणुदेवी यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. दिल्लीत रेखा गुप्ता यांना भाजपने मुख्यमंत्रिपदी बसविले. त्यामुळे नितीश कुमार यांच्याऐवजी यंदा भाजपकडून महिलेला प्राधान्य दिलं जाऊ शकतं, अशीही शक्यता होती. मात्र, या सर्व चर्चांनंतर आता नितीश कुमार यांच्याच नावाचा गवगवा पहायला मिळत आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डाने लाँच केले ‘बॅरिस्टर मिस्टर पटेल’
दरम्यान, घवघवीत यशानंतर भाजपकडून बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पाडली जाणार? की भाजपकडून दुसरा नितीश कुमार यांच्याऐवजी दुसरी चेहरा देण्यात येणार? हे आता पुढील काही दिवसांतच चित्र स्पष्ट होणार आहे.
