Bihar Cast Survey : बिहारमधील राजकारणात (Bihar Cast Survey) आजचा दिवस महत्वाचा आहे. आज बिहार विधानसभेत जातीय जनगणनेवरील अहवाल मांडण्यात येणार आहे. या अहवालावर विधानसभेत चर्चा होणार आहे. हा अहवाल जारी होण्याआधी जातीगत जनगणनेचे आकडे समोर आले आहेत. यानुसार राज्यात फक्त 7 टक्के लोकसंख्या पदवीधर आहे.आर्थिक स्थितीचा विचार केला तर राज्यात सर्वसाधारण गटात 25.9 टक्के कुटुंब गरीब आहेत. सवर्णांमध्ये सर्वात जास्त गरीब भूमिहार आणि ब्राह्मण समाजातील आहेत. नितीश कुमार (Nitish Kumar) सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यात जातनिहाय जनगणना केली होती. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अहवालातील आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता हा अहवाल विधानसभेत मांडण्यात येणार आहे. याबरोबरत जातनिहाय जणगणनेचे आर्थिक आणि शैक्षणिक आकडेही जारी केले जात आहेत.
शैक्षणिक परिस्थिती काय?
राज्यातील 22.67 टक्के लोकसंख्येने पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. 14.33 टक्के लोक सहावी ते आठवीपर्यंत शिक्षित आहेत. 14.71 टक्के लोक नववी ते दहावीपर्यंत शिक्षित आहेत. 9.19 टक्के लोकसंख्येने 11 ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. पदवीधारक लोकांची संख्या फक्त 7 टक्के आहे.
Bihar caste survey: नितीश कुमारांची खेळी 2024 साठी गेमचेंजर?
आर्थिक परिस्थिती काय?
सामान्य वर्गात 25.9 टक्के कुटुंब गरीब आहेत. मागासवर्गीयांत 33.16 टक्के कुटुंब गरीब आहेत. अतिमागास वर्गात 33.58 टक्के कुटुंब गरीब आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गात 42.93 टक्के कुटुंब गरीब आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील 42.70 टक्के कुटुंबे गरीब आहेत. तसेच अन्य जातींमध्ये 23.72 टक्के कुटुंब गरीब आहेत.
कोणत्या जातीत किती कुटुंब गरीब?
बिहारमध्ये 25.32 टक्के भूमिहार परिवार गरीब आहे. ब्राह्मण 25.3 टक्के, 24.89 टक्के राजपूत, 13.83 टक्के कायस्थ, 22.20 टक्के पठाण (खान) आणि 17.61 टक्के सैय्यद कुटुंब गरीब आहेत.
जातीय जनगणना म्हणजे काय?
भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. त्यातून सरकारला विविध घटकांसाठी योजना तयार करण्यासाठी मदत होते. तसेच गेल्या 10 वर्षांत कोणता घटक वंचित राहिला हे देखील लक्षात येते. त्यात जातनिहाय गणना म्हणजे जनगणना करताना लोकांची जात देखील विचारली जाते. त्यामुळे लोकसंख्येबरोबर कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे देखील समजते.
Bihar Caste Survey Results : जातीनिहाय जनगणना अन् कास्ट; बिहार सर्व्हेची संपूर्ण ABCD