Download App

Caste Based Census Report : नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक; जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर

  • Written By: Last Updated:

पटना : बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातीय जनगणनेची (Bihar Caste Based Census Report) आकडेवारी जाहीर केली आहे. बिहार सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव विवेक सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही आकडेवारी जाहीर केली आहे. बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणनेवरून बराच गदारोळ झाला होता. उच्च न्यायालयापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यानंतर आज याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने (Nitish Kumar Government) अशाप्रकारे जनगणाना करून मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (Bihar Caste Based Census Report Out )

 

बिहारमध्ये कोणती जात आणि किती टक्के?

बिहारमध्ये करण्यात आलेल्या जात आधारित सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, बिहारची एकूण लोकसंख्या 13 कोटींहून अधिक आहे. राज्यात मागासवर्गीयांची संख्या 27.13%, अत्यंत मागासवर्गीय 36.01%, सामान्य वर्ग 15.52% असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या ही अत्यंत मागासवर्गीयांची आहे. लोकसंख्येनुसार अत्यंत मागासवर्ग 36.01 टक्के असून त्यांची संख्या 4,70,80,514 आहे. तर मागासवर्गीय 27.12 टक्के असून त्यांची संख्या 3,54,63,936 आहे.

मलाच का बोलता? सर्वांना बोला, नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल; भुजबळांचं जरागेंना प्रत्युत्तर

अनुसूचित जाती 19.6518 % असून त्यांची लोकसंख्या 2,56,89,820 आहे तर, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 21,99,361 आहे जी एकूण लोकसंख्येच्या 1.6824 % आहे. अनारक्षित म्हणजेच सर्वसाधारण जातीची लोकसंख्या  2 कोटी 2 लाख 91 हजार 679 आहे जी बिहारच्या एकूण लोकसंख्येच्या 15.5224 टक्के आहे.

बिहारमधील जातींची टक्केवारी किती? 

जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात नितीश सरकारने एकूण 215 जातींची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमधील जातनिहाय लोकसंख्या मुस्लिम- 17.70 टक्के, यादव- 14. 26 टक्के, कुर्मी – 2.87 टक्के, कुशवाह- 4.21 टक्के, ब्राह्मण- 3.65  टक्के, भूमिहार- 2.86 टक्के, राजपूत- 3.45 टक्के, मुशार- 3.08 टक्के, मल्लाह- 2.60 टक्के, व्यापारी –2.31 टक्के, कायस्थ – 0.60 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी ‘विश्वगुरू’, पण खलिस्तानवाद्यांचा… ठाकरे गटाचा निशाणा

मुख्यमंत्री नितीश कुमार याचे ट्विट  

जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करून संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. जातनिहाय गणनेचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. 02-06-2022 रोजी मंत्रिपरिषदेने याला मान्यता दिली. या आधारे राज्य सरकारने स्वत:च्या संसाधनातून जातनिहाय जनगणना केल्याचे नितीश यांनी म्हटले आहे.

जातीवर आधारित जनगणनेने केवळ जातींबाबत नव्हे तर, प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीचीही माहिती समोर येण्यास मदत झाली आहे. या आधारे सर्व घटकांच्या विकास व उन्नतीसाठी पुढील कार्यवाही केली जाईल असे विश्वास नितीश यांनी दिला आहे.

Tags

follow us