Download App

Video : पत्नीशिवाय पंतप्रधानांनी बंगल्यात राहू नये; लालूंचा मोदींना खोचक टोला

Lalu Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देणारे आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) पुन्हा एकदा अशाच वक्तव्याने चर्चेत आले आहेत. विरोधी पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लग्नाच्या सल्ल्यावर त्यांनी भाष्य केले.

विमानतळावर पत्रकारानी लालू प्रसाद यादव यांना घेरले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता टीका केली. त्यांच्या या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. विरोधी पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल आणि राहुल गांधी यांना दिलेल्या लग्नाच्या सल्ल्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर यादव म्हणाले, जो कोण पंतप्रधान बनतो, त्याने पत्नीशिवाय पंतप्रधान निवासस्थानी राहणं चुकीचं आहे, ही पद्धत बंद केली गेली पाहिजे.

राजकारणात कुणी निवृत्त होत नाही

लालू यादव यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणात थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यावर लालू यादव म्हणाले, शरद पवार हे मजबूत नेते आहेत. अजित पवार म्हटले म्हणून ते निवृत्त होणार आहेत का. वृद्ध व्यक्ती निवृत्त होतो का, राजकारणात कुणीही निवृत्त होत नाही, असे यादव म्हणाले.

मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपची तर जिरणार नाही ना? कार्यकर्त्यांचं फडणवीसांना पत्र

राहुलजी लवकर लग्न करा 

लालू यादव यांनी याआधी पटना येथे आयोजित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लवकरच लग्न करण्याचा सल्ला दिला होता. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत लालू म्हणाले, राहुल गांधी सध्या चांगले काम करत आहेत. पण आता त्यांनी दाढी कमी करायला हवी आणि लवकर लग्न करावे. आम्ही वर्हाडी म्हणून येऊ. असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

Tags

follow us