Download App

“मीच लालूंना सीएम केलं” नितीशकुमारांचा दावा किती खरा? 1990 चा किस्सा समजून घ्याच!

नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.

Bihar Politics Nitish Kumar : बिहारमध्ये निवडणुका जवळ येताहेत. त्यामुळे राज्यातील (Bihar Politics) वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यांच्यातील जोरदार (Tejashwi Yadav) वाक् युद्ध बिहारच्या जनतेने पाहिले. याच दरम्यान नितीशकुमार यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. खरंतर नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.

मागील काही दिवसांचं राजकारण पाहिलं तर तेजस्वी यादव नितीशकुमार यांच्यावर जोरदार शा‍ब्दिक हल्ले करत आहेत. तर दुसरीकडे नितीशकुमारही तेजस्वी यादव यांना लहान मुलगा संबोधून त्यांच्यात राजकीय परिपक्वता नाही असे सूचित करत आहेत. पण यातच नितीशकुमार आणखी पुढे निघून गेले. लालू यादव यांना (Lalu Prasad Yadav) बिहारचा मुख्यमंत्री करण्यात आपली भूमिका होती असे सांगून टाकले. यानंतर खरंच नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना मदत केली होती का, नितीश यांच्यामुळेच लालू यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले होते का असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. नितीशकुमार यांचा हा दावा किती खरा आहे याची माहिती घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडे मागे जावे लागेल.

लालू नितीश यांच्यात कधी झाली दोस्ती

खरंतर ही स्टोरी 1974 पासून सुरू होते. त्यावेळी पटना विश्वविद्यालय विद्यार्थी संघाचे अध्यक्षपदी विराजमान होत लालू यादव पहिल्यांदा चर्चेत आले होते. हा काळ जेपी आंदोलनाचा होता. पूर्ण राज्यात काँग्रेस विरोधात एक अभियानच सुरू होते. बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थी असलेले नितीशकुमार सुद्धा राजकारणात उतरले होते. दोन्ही नेते राजकारणात असले तरी दोघांची राजकीय विचारधारा वेगळी होती.

लालू प्रसाद यादव यांनी 1977 मध्ये छपरा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. तर विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांचा पराभव झाला होता. त्यांना पहिला विजय 1985 मध्ये मिळाला होता. दोन्हीही नेते त्यावेळी माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या नेतृत्वातील लोकदलाचे घटक होते. यामुळे दोघांमध्ये सहाजिकच मैत्री झाली होती.

IIT बाबाकडे सापडला गांजा, जयपूर पोलिसांनी केली अटक, तात्काळ जामीनही मंजूर..

कर्पूरी ठाकूर यांच्या निधनाने राजकारणात बदल

फेब्रुवारी 1988 मध्ये कर्पूरी ठाकूर यांचे निधन झाले त्यावेळी लालू यादव यांच्यासह शिवानंद तिवारी, नितीशकुमार, रघुवंश प्रसाद सिंह, जगदानंद सिंह आणि विजय कृष्ण पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते होते. तसेच विनायक प्रसाद यादव, अनुप लाल यादव आणि गजेंद्र हिमांशु यांचाही वरचष्मा होता.

लालू प्रसाद यादव यांनी नंतरच्या काळात आक्रमक भूमिका घेतली. पक्षातील उत्तराधिकारी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल आणि शरद यादव यांच्याशी जवळीक असल्याने त्यावेळी अनुप लाल यादव विरोधी पक्षनेते होणार होते. परंतु ऐनवेळी शिवानंद तिवारी आणि नितीशकुमार यांनी या पदासाठी लालू यादव यांना पाठिंबा दिला. या राजकारणामुळे लालू यादव विरोधी पक्षनेते आणि लोकदलाचे नेते बनण्यात यशस्वी ठरले.

लालू यादव यांना झटकाही बसलाच

अशा वेळी व्हीपी सिंह यांनी आपल्या जनमोर्चाला लोकदल आणि अन्य समाजवादी पक्षांबरोबर विलीन करत जनता दल स्थापन केले. त्यावेळी लालू प्रसाद यांना राजकीय नुकसान सहन करावे लागले. कारण व्हीपी सिंह यांना त्यांनी समर्थन दिले नव्हते. यानंतर सन 1990 मधील विधानसभा निवडणुकीत जनता दलाने मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवारच सांगितला नव्हता.

या निवडणुकीत जनता दलाचा विजय झाला त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर राजकीय डावपेच सुरू झाले. सुंदर दास यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी व्हीपी सिंह यांची इच्छा होती परंतु त्याचवेळी देवीलाल यांनी लालू यादव यांना समर्थन दिले. त्याचवेळी लालू यादव यांनी चंद्रशेखर यांना बोलावले. त्यावेळी चंद्रेशखर उत्तर बिहारमधील दिग्गज नेते रघुनाथ झा यांचे समर्थन करत होते. ते मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत होते खरे पण त्यांना हेही माहिती होते त्यांना विजय मिळवता येणार नाही. सुंदर दास यांना रोखण्यासाठी चंद्रशेखर यांनी लालू यादव यांना पाठिंबा दिला त्यामुळे शेवटी लालू यादव यांचा विजय झाला. पक्षांतर्गत निवडणुकीत लालू यादव यांना 59 तर सुंदर दास यांना 56 तसेच रघुनाथ झा यांना फक्त 14 मते मिळाली. रघुनाथ झा यांना मिळालेल्या मतांनीच खरंतर लालू यादव यांचा विजय निश्चित केला होता.

लालू यादव यांच्या सीएम पदात नितीशकुमार

आता प्रश्न हा आहे की लालू यादव यांच्या मु्ख्यमंत्री होण्यामागे आपली भूमिका होती असे नितीशकुमार का म्हणत आहेत. समस्तीपूर येथील ज्येष्ठ नेते विजयवंत चौधरी म्हणतात की नितीशकुमार यांचा इशारा लालू यादव यांच्यासाठी वकिलीकडे होता. ते चंद्रशेखर यांच्या गटात होते. त्यांनी पाहिलं की शिवानंद तिवारी आणि नितीशकुमार या दोघांनी अटीतटीच्या लढतीत लालू यादव यांच्यासाठी भूमिका बजावली. लालू यादव मुख्यमंत्री होणे निश्चित होते. त्यांना आपल्या सहकाऱ्यांचे समर्थन मिळाले. विधानसभेत तेजस्वी यादव यांच्यावर कटाक्ष करताना नितीश यांचा हाच उद्देश असावा.

नितीशकुमार यांना लालू यादव यांचे समर्थन करणे यासाठीही आवश्यक वाटले की 1989 मध्ये विजय कृष्ण यांच्या पुढे जाऊन त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते. या निवडणुकीत नितीश यांनी काँग्रेस नेते राम लखन यांचा पराभव केला होता.

काय सांगता? बिहारचं बजेट जगातील 150 देशांच्या GDP पेक्षा जास्त, सविस्तरच वाचा

नितीशकुमारांचं राजकारण काय

1991 मधील निवडणुकांत व्हीपी सिंह प्रचारासाठी बिहारमध्ये आले होते त्यावेळी लालू यादव यांनी व्हीपी सिंह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी व्हीपी सिंह माजी पंतप्रधान झाले होते. ज्यावेळी लालू यादव यांनी हेलिकॉप्टरमध्ये व्हीपी सिंह यांना आपल्या आवडत्या सीटवर पाहिले त्यावेळी त्यांनी लालू यादव व्हीपी सिंह यांना राजा साहब मेरी सीट से हट जाइए असे म्हणाले होते. व्हीपी सिंह यांनीही लालूंचे म्हणणे ऐकले होते.

नितीशकुमार यांच्या राजकारणाचा विचार केला तर त्यांनी सन 1994 मध्ये जनता दलाला सोडचिठ्ठी दिली. नंतर जॉर्ज फर्नांडीस यांच्याबरोबर समता दलाची स्थापना केली. जेपी आंदोलनापासून मित्र असलेल्या लालू यादव आणि नितीश कुमार यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. यानंतर 2015 आणि नंतर 2020 मध्ये लालू यादव आणि नितीशकुमार पुन्हा सोबत आले. परंतु, दोन्ही वेळेस त्यांची आघाडी तुटली. परंतु, आता निवडणुका जवळ आल्यावर लालू प्रसाद यादव अधूनमधून नितीशकुमार यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात.

follow us