‘इंडिया’ आघाडीला दुसरा धक्का! ममतांनंतर ‘आप’नेही सोडली साथ? पंजाबात स्वबळाचे संकेत

‘इंडिया’ आघाडीला दुसरा धक्का! ममतांनंतर ‘आप’नेही सोडली साथ? पंजाबात स्वबळाचे संकेत

INDIA Alliance : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliacne) जोरदार धक्के बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिला धक्का दिला. त्यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पार्टीने (AAP) दुसरा धक्का दिला आहे. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व जागा (Lok Sabha Election) लढणार असल्याचा दावा केला आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तरी देखील या घडामोडींमुळे आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली याबद्दल मुख्यमंत्री मान यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार नाही. राज्यातील 13 जागांवर आम्हाला यश मिळेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात आम आदमी पार्टीची वाटचाल कशी असेल याचे संकेत मिळत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला मात्र धक्के बसू लागले आहेत. मुख्यमंत्री मान यांनी वक्तव्य केले असले तरी याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

ममतांच्या खेळीने काँग्रेस प्रेशरमध्ये? नितीश-अखिलेश अन् केजरीवालांचाही फायदा

ममता बॅनर्जींचा स्वबळाचा नारा 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आम्ही जागावाटपाचा जो प्रस्ताव दिला होता तो काँग्रेसने नाकारला. त्यानंतर काँग्रेसने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे आता आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असे बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने राज्यातील एकूण जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेसला देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसा प्रस्तावही काँग्रेसला देण्यात आला होता. काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या मुद्द्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसने 10 ते 12 जागांची मागणी केली होती अशी माहिती तृणमूल काँग्रेसमधील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला? व्हायरल पत्राचं खरं इलेक्शन कमिशनने सांगितलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube