Bihar : देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. बिहारमध्ये भाजपने नवी खेळी खेळली असून खांदे बदलणार असल्याचं समोर येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitin Kumar) यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असून बिहारचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात येत आहे. यासोबतच नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
बिहारमध्ये एनडीएच्या वाट्याला राज्यसभेच्या 8 जागा येणार असून दोन जागा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. याच दोन जागांपैकी एका जागेवर नितीश कुमार राज्यसभेत जाणार असल्याची शक्यता आहे.
सावध, ‘या’ चुकांमुळे तुमचं बँक अकाउंट अचानक लॉक होणार! जाणून घ्या नियम
नितीश कुमार सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्यसभेत गेल्यास बिहारचा पुढच्या मुख्यमंत्रिपदावर भाजप दावा करणार असल्याची शक्यता आहे. भाजपच्या बिहारमध्ये सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहेत. अशातच मुख्यमंत्रिपद भाजपाकडे गेल्यास उपमुख्यमंत्रिपदी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे बसणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या नामांकनासाठी 5 मार्च ही शेवटची तारीख असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस उरलेला आहे. अशातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास बिहारचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघणार असल्याचं बोललं जात आहे.
