Download App

Bihar Politics : बिहारमध्ये NDA ला धक्का! जागावाटपानंतर केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजीनामा

Bihar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील जागावाटप झालं. परंतु, या (Bihar Politics) जागावाटपाने बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीला तडे गेले आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या (Pashupati Paras) पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री पारस नाराज झाल्याच्या चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू होत्या. या चर्चा खऱ्या होत्या हे आज स्पष्ट झाले. पशुपती पारस यांनी आज केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जागावाटपात माझ्या पक्षावर अन्याय झाला. आम्हाला एकही जागा मिळाली नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याआधी पशुपती पारस मोदी सरकारमध्ये खाद्य मंत्री होते.

बिहारमध्ये ‘एनडीए’चं जागा वाटप ठरलं! घटक पक्ष वरचढ, महाराष्ट्रात काय होणार?

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. काल सत्ताधारी एनडीए जागावाटप निश्चित झालं. यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला 16, भाजप 17, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 5 जााग मिळाल्या. परंतु, केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. या घडोमोडींवरुन मंत्री पारस कमालीचे नाराज झाले. पारस राजीनामा देतील अशा चर्चा कालपासूनच सुरू झाली होती. जागावाटप करताना त्यांच्याबरोबर कुणी चर्चाही केली नाही.

पुतण्या चिराग पासवान यांना भाजपकडून जास्त महत्व दिले जात असल्याने पशुपती पारस अस्वस्थ झाले होते. जागावाटपात जागा मिळणार नाही याचा अंदाज त्यांना आला होता. यानंतर त्यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी भाजपला इशाराही दिला होता. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर आज पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता पारस पुढे काय करणार, इंडिया आघाडीत सहभागी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाकरे एकटेच नाहीत, इंदिरा गांधींसारखे बलाढ्य नेतेही चिन्हाचे युद्ध हरले !

दरम्यान, संपूर्ण देशाप्रमाणे बिहारमध्येही एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 4 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 5 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 5 जागांवर, चौथ्या टप्प्यात 5 जागांवर, पाचव्या टप्प्यात 5 जागांवर, सहाव्या टप्प्यात 8 जागांवर मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात 8 जागांवर लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 13 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपला 31 जागा मिळू शकतात. त्यातील वीस जागांवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता अजित पवार गट एवढ्या जागांवर राजी होणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज