Download App

बिपरजॉय वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार, पुढील 48 राज्यात रेडअलर्ट

  • Written By: Last Updated:

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गुजरातसह अनेक राज्यांनी त्याचा प्रभाव पडण्याची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे गजबजलेली घरे आणि कच्चा घरांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील 48 हे गुजरातसाठी महत्वाचे असतील. या काळात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ( biparjoy-storm-close-to-gujarat-read-how-much-will-be-the-effect-in-delhi-rajasthan-and-madhya-pradesh)

आयएमडीचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ सध्या मुंबईपासून दूर आहे. बिपरजॉय 15 जून रोजी मांडवी आणि कराची दरम्यान उतरण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत कच्छ, सौराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा 

खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व मध्य आणि लगतच्या पश्चिम मध्य अरबी समुद्रातील मासेमारी कार्य गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यासोबतच गुजरात सरकारने सौराष्ट्र, कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यांतील किनारी भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम केले आहे. सरकारने लोकांना समुद्र किनाऱ्याजवळ जाण्यास मनाई केली आहे.

Biparjoy Cyclone अगोदर भारताला धडकली ‘ही’ 5 मोठी चक्रीवादळं; अनेकांचा घेतला जीव!

कोणत्या गोष्टींचे नुकसान होऊ शकते?

बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रेल्वे, ओव्हरहेड पॉवर लाईन्स, सिग्नलिंग यंत्रणा विस्कळीत होऊ शकतात, तर राज्यात शेती पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. चक्रीवादळ कच्छमधील जाखौला धडकण्याची शक्यता आहे, जेथे मच्छीमार आणि मीठ व्यापारी आर्थिक नुकसान सोसत आहेत. तथापि, पाकिस्तान आणि लगतच्या पश्चिम भागात सक्रिय कोरड्या वाऱ्यांमुळे चक्रीवादळ त्वरित कमकुवत होईल.

Tags

follow us