नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार 2021-22 मध्ये भाजपला 614 कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेसला 95 कोटी रुपये मिळाले. गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या 20 हजारांहून अधिक देणग्या 780.77 कोटी होत्या, ज्या एकूण 7141 डोनेशन्समधून प्राप्त झाल्या होत्या.
भाजपने 4,957 देणग्यांमधून एकूण 614.63 कोटी रुपये जाहीर केले आहेत. यानंतर काँग्रेसची जागा आहे. 1,255 देणग्यांमधून 95.46 कोटी रुपये जाहीर केले आहेत. भाजपने घोषित केलेल्या देणग्या या कालावधीसाठी काँग्रेस, NCP, CPI, CPI(M), NPEP आणि तृणमूल कॉंग्रेसने घोषित केलेल्या एकूण देणग्यांपेक्षा तिप्पट आहेत.
बहुजन समाज पक्षाने (BSP) सलग 16 व्या वर्षी 20,000 रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली नसल्याचे जाहीर केले. अहवालात असे म्हटले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणगीत 187.026 कोटींची वाढ झाली आहे, जी मागील आर्थिक वर्ष 2020-21 पेक्षा 31.50 टक्के अधिक आहे.
भाजपला देणग्या 2020-21 मध्ये 477.55 कोटी रुपयांवरून 2021-22 मध्ये 614.63 कोटी रुपयांवर गेल्या, एका वर्षात 28.71 टक्क्यांनी वाढ झाली. काँग्रेसच्या देणग्या आर्थिक वर्ष 2020-21 मधील 74.52 कोटी रुपयांवरून 2021-22 मध्ये 95.46 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या, 28.09 टक्के वाढ.
अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी Jitendra Awhad यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल
काँग्रेसला 95.459 कोटी
2020-21 या आर्थिक वर्षात काँग्रेसला मिळालेली देणगी 74.524 कोटी होती, जी 2021-22 या आर्थिक वर्षात वाढून 95.459 कोटी झाली आहे. यामध्ये 28.09 टक्के वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष 2019-20 आणि आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान काँग्रेसच्या देणगीत 46.39% ची घट झाली आहे.